गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयातच प्रकल्पग्रस्तांचा आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि पुनर्वसन करावे या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मीवाडी परिसरातील ग्रामस्थांनी पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही त्यांना जमिनीचा मोबदला अथवा पुनर्वसन झालेला नाही. त्यामुळे आज आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्ताने गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
यानंतर गडमूडशिंगी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कोल्हापूर विमानतळासाठी लक्ष्मीवाडी टेकडी परिसरासह महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्थेची जागा संपादित केलेली आहे. मात्र त्यांना योग्य दराप्रमाणे मोबदला आणि पुनर्वसन झालेलं नाही. याबाबत वारंवार प्रशासनासोबत पाठपुरावा ग्रामस्थांकडून केला जात आहे. याबाबत कोणताही ठोस निर्णय अद्यापही घेतला नसल्याने या परिसरातील प्रकल्पग्रस्त हे आक्रमक झालेले आहेत.