For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या सैन्य वारशाचा शोध घेणारा ‘उद्भव’ प्रकल्प

06:48 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या सैन्य वारशाचा शोध घेणारा ‘उद्भव’ प्रकल्प
Advertisement

प्राचीन महाकाव्यांच्या पडताळणीस सैन्याकडून प्रारंभ : अद्वितीय अन् समग्र दृष्टीकोन तयार करणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या समृद्ध सैन्य वारशाचा शोध घेण्यासाठी ‘उद्भव’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश संरक्षणाच्या क्षेत्रात स्वदेशी दृष्टीकोनाला वृद्धींगत करणे आहे. हा प्रकल्प मागील वर्षी सुरू करण्यात आला होता अशी माहिती सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मंगळवारी दिली आहे.

Advertisement

या प्रकल्पाच्या अंतर्गत वेद, पुराण, उपनिषदे आणि अर्थशास्त्र यासारख्या प्राचीन ग्रंथांच्या माध्यमातून सैन्य वारसा जाणून घेतला जाणार आहे. याच्या माध्यमातून प्रतिष्ठित भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वानांदरम्यान पुरेशा बौद्धिक अभिसरणाचा खुलासा झाला आहे.

भारतीय सामरिक संस्कृतीत ऐतिहासिक पॅटर्नविषयक संमेलनात सैन्यप्रमुखांनी ही टिप्पणी केली आहे. ‘उद्भव’ प्रकल्प सैन्यदलाला ‘भविष्यासाठी सज्ज’ करण्यासाठी आहे. तसेच भारताच्या प्राचीन रणनीतिक कौशल्याला समकालीन सैन्यक्षेत्रात एकीकृत करत सैन्याला तयार करणे आहे. या प्रकल्पात वेद, उपनिषदे अणि अर्थशास्त्र यासारख्या प्राचीन ग्रंथांची सखोल पडताळणी करण्यात आली आहे. ही पडताळणी परस्पर संबंध, धार्मिकता आणि नैतिक मूल्यांवर आधारित राहिल्याचे सैन्यप्रमुखांकडून सांगण्यात आले. चाणक्य यांच्याकडून लिखित अर्थशास्त्रात युद्धकला, शासनव्यवस्था आणि राजनीतिसमवेत अनेक गूढ विषयांवर विचार मांडण्यात आले आहेत.

रणनीतिचा लावला शोध

महाभारताचे युद्ध, मौर्य, गुप्त आणि मराठ्यांच्या शासनकाळातील सामरिक उत्कृष्टतेचे अध्ययन यात करण्यात आल्यामुळे भारताच्या समृद्ध सैन्य वारशाला आकार मिळाला होता. उद्भव प्रकल्प प्रख्यात भारतीय आणि पाश्चिमात्य विद्वांनामधील बौद्धिक अभिसरणासाठी सांगतो. तसेच त्यांचे विचार, दर्शन आणि दृष्टीकोनादरम्यान प्रतिध्वनि दर्शवितो, यामुळे भारताच्या आदिवासी परंपरा, मराठ्यांचा नौसैनिक वारसा आणि सैन्य दिग्गज, विशेषकरून महिलांच्या वैयक्तिक शौर्यपूर्ण कामगिरीविषयी कळले आहे. तसेच नव्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी प्रेरणा मिळाली. हा प्रकल्प शिक्षणतज्ञ, विद्वान, अध्ययनकर्ते आणि सैन्यतज्ञांदरम्यान नागरिक-सैन्य सहकार्याला बळ पुरवत पूर्ण देशाचा दृष्टीकोन मजबूत करत असल्याचे सैन्यप्रमुख पांडे यांनी नमूद केले आहे. उद्भव प्रकल्प एक रणनीतिक शब्दावली आणि वैचारिक चौकट निर्माण करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. यात भारताचा दार्शनिक आणि सांस्कृतिक वारसा सामावलेला असल्याचे संरक्षण मंत्रालयाने मागील वर्षी सांगितले होते.

सामूहिक प्रयत्नामुळे कक्षा व्यापक

अशाप्रकारच्या सामूहिक प्रयत्नामुळे प्राचीन भारताच्या संरक्षण आणि शासनाच्या अध्ययनाची कक्षा व्यापक केली जाऊ शकते. तसेचा भारताचा रणनीतिक दृष्टीकोन समृद्ध केला जाऊ शकतो. आम्ही आमच्या सैन्य वारशासंबंधी अधिक संशोधन करू शकतो. युद्धात कठोर भारतीय सशस्त्र दलांचा विशाल अनुभव, बलिदान आणि विजय आमच्या रणनीतिक संस्कृतीला मजबूत करतील असे उद्गार सैन्यप्रमुखांनी काढले आहेत.

सैन्याकडून प्रदर्शनाचे आयोजन

सशस्त्र दलांचा इतिहास आणि वारसा आमच्या राष्ट्रीय संस्कृती आणि ओळखीचा अविभाज्य घटक म्हणून साजरा करण्यात येत आहे. सैन्याने ‘भारतीय सैन्य प्रणालींचा विकास, युद्ध आणि सामरिक विचार-पुरातनापासून स्वातंत्र्यापर्यंत’ या नावाने प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनामुळे आमच्या भूतकाळासोबत जागतिक क्षेत्रात भारतीय सैन्याची स्थिती जाणून घेण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सैन्यप्रमुख पांडे म्हणाले.

Advertisement
Tags :

.