For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वेक्षण अहवाल 4 आठवडे सार्वजनिक करण्यास मनाई

06:32 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वेक्षण अहवाल 4 आठवडे  सार्वजनिक करण्यास मनाई
Advertisement

न्यायालयाने एएसआयचा अर्ज स्वीकारला

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

ज्ञानवापी संकुलाशी संबंधित एएसआयच्या सीलबंद सर्वेक्षण अहवालासंबंधीचा आपला निर्णय शनिवारी जिल्हा न्यायालयाने जाहीर केला. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने एएसआयचा अर्ज स्वीकारला असून टीमने चार आठवड्यांपर्यंत अहवाल सार्वजनिक न करण्याचे आवाहन केले होते. एएसआयने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून सर्वेक्षण अहवाल 4 आठवड्यांपर्यंत सार्वजनिक करू नये, अशी विनंती केली होती. ही विनंती वाराणसी जिल्हा न्यायालयाने मान्य केली आहे.

Advertisement

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) ज्ञानवापीचा पाहणी अहवाल दोन सीलबंद लिफाफ्यांमध्ये जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. अहवालाची मागणी केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम बाजूनेही केली आहे. हिंदू पक्षाने अहवालाची प्रत त्वरित देण्याची विनंती केली होती. मुस्लीम पक्षाने आधी आक्षेप घेतला, नंतर ईमेल आयडी देऊन अहवाल मागवला. याप्रकरणी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा न्यायालयाच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा होती.

अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात आक्षेप नोंदवला आहे. प्रतिज्ञापत्र घेऊनच सर्वेक्षण अहवाल द्यावा, अशी विनंती समितीने केली. सर्वेक्षण अहवाल लीक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.