For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रगतीची वाट शिक्षणातून जाते- विशाल परब

03:23 PM Jul 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
प्रगतीची वाट शिक्षणातून जाते  विशाल परब
Advertisement

नेमळेत भाजपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

प्रगतीची वाट शिक्षणातून जाते. भाजपाच्या कोकणातील सर्व नेत्यांना इथल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवरील आर्थिक संघर्षाची कल्पना आहे. आपले नेते रविंद्र चव्हाण, नारायण राणे यांची आजची यशस्वी वाटचाल ही कधीकाळी अशाच संघर्षातून झालेली आहे. मी स्वत:देखील या परिस्थितीतून गेलो असल्याने रविंद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दप्तर वाटपाचा कार्यक्रम राबवत आहे असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नेमळे येथे केले . राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण व खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद नेमळे शाळेतील विद्यार्थ्यांनादप्तर व शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते . यावेळी उपस्थित शिक्षक व पालकवर्गाने विशाल परब यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि मोठे होऊन आमचे विद्यार्थीही भाजपाच्या या समाजसेवेचा वारसा निश्चितपणे पुढे चालवतील असा शब्द विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिला .

Advertisement

यावेळी विशाल परब यांच्या समवेत नेमळेचे माजी सरपंच.विनोद राऊळ, ॲड अनिल निरवडेकर, मनोहर राउळ, सुनील राऊळ, प्रविण वेंगुर्लेकर, भास्कर राऊळ, नंदकुमार देवळी, प्रकाश नेमळेकर, शशिकांत नाईक, समीर नेमळेकर, रोहित राऊळ,साई नाईक, गौरवी कुणकेरकर, सुहास पिकुळकर, गुरुनाथ पिकुळकर, साक्षी राऊळ, विनित राऊळ, मुख्याध्यापक श्री विठ्ठल तुळसकर, गौरव मुळीक, महिला गाव अध्यक्षा तन्वी राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.