For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त चराठे वझरवाडी शाळेत कार्यक्रम

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त चराठे वझरवाडी शाळेत कार्यक्रम
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपालिकेचे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिम्मित दि. १८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशन मार्फत चराठे वझरवाडी शाळा नं २ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी वझरवाडी शाळेसह अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थी मुलांना वृक्षांचे वितरण करण्यासह खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला चराठे सरपंच सौ. प्रचिती कुबल, सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अँथोनी डिसोजा, संस्थेचे सचिव इलियास गोम्स, ज्येष्ठ कार्यकर्ते पॉली परेरा, उपाध्यक्ष बॅन्हर परेरा, सदस्य लुईस फर्नांडिस, महिला सदस्या सौ. सिल्व्हिया फर्नांडिस, सौ. पेरपेदीन फर्नांडिस, सौ. मिलाग्रिन गोम्स,शाळा समिती अध्यक्ष संदीप कदम, शाळा समिती उपाध्यक्ष सुनील खरात, ग्रामपंचायत सदस्या वृंदा मेस्त्री, मुख्याध्यापिका- सौ अर्चना कविटकर, शिक्षिका- मनिषा गुरव, अंगणवाडी सेविका सौ. नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी चराठे सरपंच सौ. प्रचिती कुबल यांनी सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशन या संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक करीत अशा प्रकारचे पर्यावरण पूरक उपक्रम काळाची गरज असल्याचे सांगितले. तर वझरवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील खरात यांनीही सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनचा वृक्षारोपण उपक्रम आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अँथोनी डिसोजा यांनी ही संस्था आम्ही स्थानिक लोक एकत्र येऊन स्थापन केली आहे. समाजातील रंजलेल्या गांजलेल्याच्या कार्याला हातभार लावण्याचे तसेच इतर समाज कार्य आम्ही सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन करत असतो. त्याचाच हा भाग म्हणून सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.
चराठे गावच्या सरपंच सौ. प्रचिती कुबल यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी हा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना कविटकर यांनी संस्थेचे आणि मान्यवरांचे आभार मानले. तसेच सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनचे जेष्ठ कार्यकर्ते पॉली परेरा यांनी शाळेचे आणि मान्यवरचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.