'वंदे मातरम' सार्धशताब्दी महोत्सवानिमित्त समूहगीत गायन
स्व. जयानंद मठकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे "वंदे मातरम " या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने सावंतवाडी कोलगाव येथील स्व. जयानंद मठकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी समूहगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या मूर्तीला हार आणि पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, कमलाकर ठाकूर, नामदेव सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, उपप्राचार्य निलेश ठाकूर, सुचिता नाईक, आरपीडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर , राजेश वाडकर, गुरुनाथ चोडणकर, अभिषेक रेगे, संपदा राणे, मिहिर मठकर, श्रिया सावंत, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, आदी उपस्थित होते. यावेळी जयानंद मठकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी माळकर वंदे मातरम या राष्ट्रीय गीतावर नाटिका सादर केली. तसेच ज्ञानदा गुरुकुल पुणे येथील मोबिलायझेशन अधिकारी अमित नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.