सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने देवसूत लोकसंवाद' कार्यक्रम
सायबर गुन्हे, नशा मुक्ती, व "डायल 112 " या विषयांवर मार्गदर्शन
ओटवणे प्रतिनिधी
तीन वर्षांपूर्वी देवसू गावामध्ये नागरिकांनी एकत्रित येत केलेली अवैध दारू विक्री बंदी कौतुकास्पद असून लोकांचे सहकार्य असेल तर गावातील गुन्हे, तंटे व इतर असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त त्वरीत करता येईल असे प्रतिपादन आंबोली पोलीस दुरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी केले. सिंधुदुर्ग पोलिसांच्यावतीने देवसू प्राथमिक शाळेत सायबर गुन्हे,नशा मुक्ती,व "डायल 112 "या तीन विषयांवर "लोकसंवाद " या कार्यक्रमात दत्तात्रय देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पोलिस निरीक्षक सरदार पाटील, आंबोली पोलीस दुरक्षेत्र हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, सरपंच रूपेश सावंत, तलाठी संतोष धोंड, देवसु पोलिस पाटील प्रविण सावंत, ओवळीये माजी पोलिस पाटील लाडू जाधव, वनरक्षक रोहित माळी, ग्रामपंचायत सदस्य शांताराम सावंत, पंकज परब, देवसू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रविण ठाकूर व सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुराव देऊसकर, काशीराम जाधव, सुनिल सावंत, जेष्ठ नागरीक सोमा सावंत, आत्माराम सावंत, अशोक सावंत आदी उपस्थित होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रस्ते सुरक्षा सप्ताहाची माहिती दिली. तसेच वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी? याचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांमार्फत कशी जनजागृती करायचे याचे धडे विद्यार्थ्यांना दिले. तसेच जेष्ठ नागरिकांनी सायबर गुन्ह्याबाबत अनोळखी फोन कॉल्स आल्यावर काय काळजी घ्यावी याची देखील माहिती सांगितली. तसेच पोलिसांसाठी आता 112 या नंबरवर संपर्क साधल्यास २४ तास पोलीस प्रशासनातर्फे मदत मिळेल याची ग्वाही दिली. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील व आंबोली पोलीस दुरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी नागरिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत जनजागृती केली.