‘गोदरेज कंझ्युमर’चा नफा 451 कोटींवर
2024-25 च्या पहिल्या तिमाहीमधील कामगिरी : महसूलामध्ये 3.40 टक्क्यांची कमी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गोदरेज कंझ्युमर, गोदरेज ग्रुपच्या एफएमसीजी कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 451 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. त्यात वार्षिक 41 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 319 कोटी रुपयांचा नफा झाला होता. एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण 3,332 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वार्षिक आधारावर 3.40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 3,449 कोटी रुपयांची कमाई केली होती. गोदरेज कंझ्युमरचे समभाग या वर्षी 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. गोदरेज कंझ्युमरचा समभाग बुधवार, 07 ऑगस्ट रोजी 0.77 टक्क्यांनी वाढून 1,490 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअर्सने गेल्या 5 दिवसात 3.31 टक्के, एका महिन्यात 4.49 टक्के, 6 महिन्यांत 20.36 टक्के आणि एका वर्षात 44.56 टक्के परतावा दिला आहे. 1 जानेवारी 2024 पासून कंपनीचा बाजारातील हिस्सा यावर्षी 30.15 टक्क्यांने वाढला आहे. गोदरेज कंझ्युमरचे बाजारमूल्य 1.55 लाख कोटी रुपयांवर आहे.
ही उत्पादने तयार करते
गोदरेज कंझ्युमर सिंथॉल आणि हिट सारखी ग्राहक उत्पादने तयार करते गोदरेज कंझ्युमर लिमिटेड मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड गुड-नाइट, सिंथॉल साबण आणि हिट सारखी उत्पादने तयार करते. गोदरेज कंझ्युमरचे 85 देशांमध्ये 120 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. जवळपास 127 वर्षे जुन्या गोदरेज ग्रुपच्या टॉप कंपन्यांपैकी ही एक आहे.