For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पतंगाच्या मांजामुळे कॉलेज रोडवर प्राध्यापक गंभीर जखमी

10:49 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
पतंगाच्या मांजामुळे कॉलेज रोडवर प्राध्यापक गंभीर जखमी
Advertisement

मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Advertisement

बेळगाव : मांजाचा फास गळ्याभोवती अडकल्याने कॉलेज रोड येथून प्रवास करणारे पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक जखमी झाले. रविवारी व्ही. आर. कुलकर्णी हे आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून जात होते. मांजा गळ्याभोवती अडकल्याने त्यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. यामध्येच चारचाकी वाहन आल्याने मोठा अपघात होणार होता. परंतु, कारचालकाने वेळीच गाडी थांबविल्याने हा अपघात टळला. परंतु, मांजामुळे कुलकर्णी यांच्या गळ्याला जखम झाली. बेळगाव शहर व परिसरात राजरोसपणे चायनीज मांजाची विक्री केली जात आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून विक्रीवर वेळीच बंदी आणणे गरजेचे आहे. केवळ पतंग स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या या चायनीज मांजामुळे अनेकांना दुखापत झाली आहे. चायनीज मांजाला काचेची पावडर लावलेली असते. यामुळे इतर पतंगांचा दोर कापण्यासाठी या मांजाचा वापर केला जातो. किराणा दुकानासोबतच स्टेशनरीमध्येही मांजा विक्रीवर बंदी असताना बेळगावमध्ये सर्रास ठिकाणी चायनीज मांजाची विक्री होत आहे. सायंकाळच्यावेळी हौस म्हणून पतंग उडविण्याच्या स्पर्धा भरविल्या जात आहेत. परंतु, ही हौस नागरिकांच्या जीवावर उठली आहे.

काही दिवसांपूर्वी अशीच घडली होती घटना

Advertisement

अशीच घटना काही दिवसांपूर्वी कपिलेश्वर उ•ाणपुलावर घडली होती. परिसरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांचा मांजा तुटून ब्रिजवर येऊन पडत आहे. ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना ते दृष्टीस न आल्याने अपघात होत आहेत. बऱ्याच जणांच्या हाताला, मानेला मांजामुळे गंभीर दुखापत झाली आहे. काही वर्षांपूर्वी तर एका महिलेला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांवर  कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.