For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुळज येथे प्रा शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

05:22 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
मुळज येथे प्रा शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
Advertisement

                          मुळज येथील वाचनालयाने सामाजिक उपक्रम राबवले

Advertisement

धाराशिव उमरगा : प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज येथे डिसेंबर 2018 मध्ये प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाची स्थापना करण्यात आली. या वाचनाला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत.

वाचनालयाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबण्यासह उमरगा-लोहारा तालुक्यातील सामाजिक, उद्योग, शिक्षण, शेती, साहित्य, पत्रकारिता, कला, क्रीडा, सहकार आणि वाचन चळवळ या क्षेत्रात विशेष काम करून बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

Advertisement

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पुणे येथील प्रसिद्ध लेखक, अर्थतज्ञ व डाव्या-पुरोगामी चळवळीतील नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर हे उपस्थित राहणार होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, ॲड शितल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement
Tags :

.