For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय सैन्यासाठी ‘खड्ग’ ड्रोनची निर्मिती

06:25 AM Dec 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय सैन्यासाठी ‘खड्ग’ ड्रोनची निर्मिती
Advertisement

रडारलाही देणार चकवा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संरक्षणाच्या क्षेत्रात भारताची शक्ती सातत्याने वाढत आहे. आता भारतीय सैन्यासाठी खड्ग कामिकेज ड्रोन तयार करण्यात आला आहे. हा ड्रोन अत्यंत घातक आहे. अशाप्रकारच्या ड्रोन्सचा वापर  रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान झाला आहे. याला आत्मघाती ड्रोन देखील म्हटले जाते, जे शत्रूचे नळ करण्यासाठी वापरले जातात.

Advertisement

हायस्पीड ड्रोन 40 मीटर प्रतिसेकंदांच्या वेगाने उड्डाण करू शकतो, ज्याची उ•ाणकक्षा दीड किलोमीटरची आहे. ड्रोन 700 ग्रॅमपर्यंतच्या स्फोटकांना वाहून नेण्यास सक्षम असून यात जीपीएस आणि हाय डेफिनेशन कॅमेरा जोडण्यात आलेला आहे. हा ड्रोन शत्रूच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जॅमिंगलाही चकवा देऊ शकतो असे बोलले जात आहे. खड्ग ड्रोन हा रडारच्या रेंजमध्येही येत नाही. यासाठीचा निर्मिती खर्च अत्यंत कमी राहिला असल्याचे समजते. ऑगस्ट महिन्यात एनएएल म्हणजेच नॅशनल एअरोस्पेस लॅबने स्वदेशी कामिकेज ड्रोन सादर केले होते, ज्यात स्वदेशी इंजिन जोडण्यात आले होत. हे इंजिन 1 हजार किमीपर्यंत ड्रोन पोहोचविण्यास सक्षम होते.

ड्रोनवरून दीर्घ नियोजन

भारत स्वत:च्या सीमांना सुरक्षित करण्यासाठी लवकरच एक ड्रोनविरोधी शाखा स्थापन करणार आहे, कारण आगामी काळात मानवरहित यानांचा धोका गंभीर ठरणार आहे. आम्ही या धोक्याला हाताळण्यासाठी समग्र दृष्टीकोन विचारात घेत संरक्षण आणि संशोधन संस्था तसेच डीआरडीओसोबत मिळून काम करत आहोत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारीच म्हटले होते.

Advertisement
Tags :

.