For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्पादन उतराखंडमध्ये, खरेदी कोल्हापुरात

12:00 PM Dec 17, 2024 IST | Radhika Patil
उत्पादन उतराखंडमध्ये  खरेदी कोल्हापुरात
Production in Uttarakhand, procurement in Kolhapur
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राज्यात बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघडकीस येत आहे. या मागचा खरा सूत्रधार कोण आहे? याबाबत सगळीकडे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मागील सोमवारी शासकीय रुग्णालयामधून धाराशिव येथील विद्यार्थांना रक्तवाढीच्या गोळ्या दिल्याने, त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. या बनावट औषधांच्या रॅकेटचे कलेक्शन कोणापर्यंत आहे ? याचा शोध घेणे आता गरजेचे आहे. याबाबत औषध कंपन्यांच्या कागदपत्रांची चौकशी खोलवर करण्याची, ती चौकशी अन्न व औषध प्रशासनाने करण्याची आता गरज भासू लागली आहे.

आंबेजोगाईसह नागपूर, ठाणे, वर्धा या बरोबर राज्यात 85 लाख रुपयांच्या बनावट गोळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. याचा पुरवठा कोल्हापुरातील विशाल एंटरप्राईजकडून करण्यात आला. या गोळ्यांचे उत्पादन उतराखंड येथे झाले असून, याचा पुरवठा कोल्हापुरात तर विक्री राज्यातील शासकीय रुग्णालयामधून करण्यात आले आहे. या औषध उत्पादक कंपनीचे बिल सुद्धा संशयास्पद असल्याचा संशय आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडून याची खात्री करण्याची गरज आहे. कोणत्याही औषध उत्पादक कंपनीकडे क्वॉलिटी कंट्रोल विभाग असतो. या तपासणीमध्ये रिजेक्ट औषधे परत पाठविली जातात.

Advertisement

नियमानुसार 500 एमजीच्या औषधामध्ये 12 टक्के घटकांचा मात्रा कमी असल्यास हे औषध फेल वा रिजेक्ट केले जाते. तसेच अशी औषधे 25 डिग्री सेल्शियसमध्येच ठेवणे आवश्यक असते. तसे बॉक्सवर लिहिले जाते. औषधांच्या रिजेक्टचा प्रकार हा नाममात्र असतो, असे असताना या कंपनीचा क्लॉलिटी कंट्रोल विभाग काय करत होता? कारण कंपनीच्या बिलावर जीएसटीसह इतर नोंद केलेली असते. यातून खोट्या बिलाद्वारेच या औषधांची विक्री झाली असल्याचा संशय आहे. हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. कारण स्थानिक अन्न व औषध विभाग याबाबत फक्त उत्पादकांकडे बोट दाखवून हात वर करत आहे. कोल्हापुरातील विशाल एंटप्राईजच्या बिलाची चौकशी, जीएसटी व अन्न व औषध विभागाने केली आहे काय? हे सुद्धा संशयास्पद आहे.

गत सोमवारी धाराशिव येथील उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील गांधी विद्यालयात विद्यार्थांना रक्तवाढीच्या आयर्न फॉलिक अॅसिड या गोळ्या देण्यात आल्या होत्या. या गोळ्या शासकीय रुग्णालयातून दिल्या होत्या. या गोळ्यामुळे 31 विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या सुरू झाल्या. या प्रकारामुळे बनावट औषधांचा प्रकार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या रक्तवाढीच्या गोळ्या कोठून आल्या याचा शोध घेणे गरजेचे आहे.

लॉबीमुळेच कायदा कागदावरच

1986 मध्ये मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटलमध्ये भेसळयुक्त औषधामुळे 14 रुग्ण दगावले होते. भारतात औषधे आणि प्रसाधने हा कायदा 1940 मधे लागू करण्यात आला आहे. तरी देखील भेसळ व बनावट औषधांची विक्री सुरू आहे. 14 रुग्णांच्या मृत्यूनंतर न्यायमूती लँटिन आयोगाने औषध क्षेत्रातील अनागोंद गैरमार्गाने पैसा कसा मिळवला जातो. याच्या शिफारसी दाखल केल्या होत्या. पण औषध लॉबीमुळेच हा कायदा कागदावरच राहिला असल्याचे स्पष्ट होते.

Advertisement
Tags :

.