कारखान्यात तयार केले खरे सोने
सोने निर्माण करण्याचा प्रयत्न शतकांपासून होत राहिला आहे. आता अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने पाऱ्यापासून खरे सोने निर्माण करण्याच्या दिशेने मोठे यश मिळविल्याचा दावा केला आहे.
फ्यूजनद्वारे निघणाऱ्या न्यूट्रॉनच्या मदतीने पाऱ्याला सोन्यात रुपांतरित करण्याचा प्रयोग केला आहे. या प्रक्रियेचा दर 2025 मधील सीईआरएनच्या रिकॉर्डपेक्षा 10 पट अधिक असल्याचे कंपनीचे सांगणे आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनी मॅराथन फ्यूजनची योजना केवळ सोने निर्माण करण्यापुरती मर्यादित नाही. कंपनी या तंत्रज्ञानाद्वारे कॅन्सरची तपासणी आणि उपचारात वापर होणारे रेडिओअॅक्टिव्ह आइसोटोप निर्माण करण्यावरही काम करत आहे. परंतु कंपनीचा दावा आणि मोठ्या प्रमाणावर सेन स्वस्त होण्याची व्यवहारिक वस्तुथितीदरम्यान अद्याप मोठा पल्ला आहे.
कसे तयार होते सोने
सर्वसाधारणपणे पारा एक चमकदार, तरल धातू आहे, तर सोने ठोस अन् मूल्यवान धातू आहे. दोघांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. मॅराथान फ्यूजन ज्या तंत्रज्ञानावर काम करत आहे, त्याला न्युक्लियर ट्रान्सम्युटेशन म्हणजेच आण्विक रुपांतरण म्हटले जाते. यात कुठल्याही घटकाच्या आण्विक केंद्र म्हणजेच न्युक्लियसमध्ये बदल करून त्याला दुसऱ्या घटकात बदलले जाते. नॉर्मल केमिकल रिअॅक्शनमध्ये कुठल्याही पदार्थाच्या अणू किंवा इलेक्ट्रॉन्सची व्यवस्था बदलू शकते. परंतु त्याचे घटक बदलत नाहीत. याच्या उलट आण्विक केंद्रात बदल झाल्यावर एक घटक दुसऱ्या घटकात बदलू शकतो. पाऱ्याला सोन्यात रुपांतरित करण्याचा दावा याच थेअरीवर आधारित आहे.
न्यूट्रॉनचा वापर
कंपनीच्या प्रस्तावित तंत्रज्ञानात पाऱ्याला एक खास आइसोटोप मर्करी-198 चा वापर केला जातो. आइसोटोप एकाच घटकाचे असे रुप असतात, ज्याच्या न्यूक्लियर सेंटरमध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते.
या प्रक्रियेला तीन टप्प्यांमध्ये समजले जाऊ शकते...
पहिला टप्पा : कंपनीच्या नियोजनानुसार फ्यूजन रिअॅक्टरमध्ये ड्यूटेरियम आणि ट्रिटियमच्या प्रतिक्रियेद्वारे वेगवान न्यूट्रॉन निर्माण केले जातील.
दुसरा टप्पा : या न्यूट्रॉनला मर्करी-198 वर टाकले जातील. प्रस्तावित न्युक्लियर रिअॅक्शनमध्ये मर्करी-198 बदलून रेडिओअॅक्टिव्ह मर्करी-197 होऊ शकतो. तिसरा टप्पा : मर्करी-197 तुटून गोल्ड-197 म्हणजेच सोन्यात बदलू शकतो. याला औद्योगिक स्तरावर प्राप्त करत रेडिओअॅक्टिव्ह बायप्रॉडक्ट्सला सुरक्षित स्वरुपात राखले जाऊ शकते.
गोल्ड-197 सोन्याचा स्थिर आइसोटोप आहे. म्हणजेज आण्विक स्तरावर निर्माण होणारे सोने खरे सोनेच असेल. परंतु याचा अर्थ निर्माण करणे सोपे किंवा स्वस्त होईल असा नाही.
सीईआरएनकडूनही निर्मिती
जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक प्रयोगशाळा सीईआरएनमध्येही आण्विक प्रक्रियांद्वारे सोने निर्माण करण्याची घटना नोंद झाली होती. सीईआरएनच्या लार्ज हॅड्रॉन कोलाइडरमध्ये अलाइस प्रयोगाद्वारे वैज्ञानिकांनी 4 वर्षांच्या मेहनतीनंतर केवळ 29 पिकोग्रॅम सोने निर्माण केले होते. एक पिकोग्रॅम एक ग्रॅमचा अब्जावा हिस्सा असतो. तर मॅराथान फ्यूजनने स्वत:च्या तंत्रज्ञानाद्वारे सोने निर्माण करण्याचा दर सीईआरएनच्या 2025 च्या रिकॉर्डपेक्षा 10 पट अधिक राहिला असल्याचा दावा केला आहे.
कॅन्सरच्या उपचारात वापर
फ्यूजनद्वारे निर्माण होणाऱ्या न्यूट्रॉनच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरणारे रेडिओअॅक्टिव्ह आइसोटोप निर्माण केले जाऊ शकतात असे मॅराथान फ्यूजनचे सांगणे आहे. कॅन्सरची तपासणी आणि उपचारात अशा आइसोटोपची महत्त्वाची भूमिका आहे. शरीराच्या आत ट्यूमरचा शोध घेण्यासाठी काही आइसोटोप मदत करतात, तर काहींचा वापर कॅन्सर पेशींपर्यंत रेडिएशन पोहोचविण्यासाठी केला जातो. कंपनीने झिंकवर न्यूट्रॉन टाकून रेडिओअॅक्टिव्ह कॉपर आइसोटोप निर्माण करण्याशी संबंधित प्रयोगांची माहिती दिली आहे. कॉपर-64 चा वापर डायग्नोस्टिक इमेजिंगमध्ये होतो, तर कॉपर-67 ची तपासणी केली जात असून याचा वापर रेडिओन्यूक्लाइड थेरपीमध्ये केला जात आहे.
