नॉन क्रिमिलियर दाखल्यांची कार्यवाही जलदगतीने
सावंतवाडी तहसीलदारांची माहिती
सावंतवाडी : प्रतिनिधी
अकरावी प्रवेशासाठी लागणाऱ्या नॉन क्रिमीलेअर दाखल्यांची कार्यवाही एक ते दोन दिवसातच केली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी 'तरुण भारत'शी बोलताना दिली दिली.दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात असून प्रत्यक्ष प्रवेशादरम्यान नॉन क्रिमिलियर आवश्यक केल्याने विद्यार्थी आणि पालकांची नॉनक्रिमिलियर दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील काही महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी तहसीलदारांची भेट घेत अशा दाखल्यांचा निपटारा जलदगतीने करण्याची मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की मी, स्वतः विद्यार्थी होतो त्यावेळी या सगळ्या प्रक्रियेतून गेलो आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी मी आपल्या स्तरावर घेत आहे. कुणी तातडीचा दाखला घ्यायला आला तर तशी ही सुविधा दिली जात आहे. त्यामुळे पालकांनी कोणतीही काळजी करू नये.;त्यांना वेळेत दाखले दिले जातील. तसेच दाखल्याची ऑनलाईन पावती देण्यासंदर्भात सेतू सुविधा केंद्राला सूचना केल्या आहेत. ती पावती देऊनही महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.