ग्रामसेवकांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याबाबत कार्यवाही सुरु
मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश
प्रतिनिधी
बांदा
ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना शासनाच्या परिपत्रकानुसार बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अदयाप पर्यत सावंतवाडी तालक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित झालेली आढळून येत नाही. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे आपण तात्काळ कार्यवाही करून बायोमेट्रिक प्रणाली लागू करावी अशी मागणी सावंतवाडी मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी सावंतवाडी बीडीओकडे केली होती. तसे न झाल्यास स्वातंत्र्य दिनी उपोषण करणार असा इशारा दिला होता. त्यांच्या मागणी नुसार त्यांच्या लेखी निवेदनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार मशीन खरेदी करण्याचे लेखी पत्र त्यांनी सावंत याना दिले असल्याने त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश आले आहे. त्यांचे उद्या होणारे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
सध्या प्रशासनाच्या विविध योजनांसाठी सामान्य नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत लागणारे दाखले मिळवताना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात वेळेत न येणे तसेच वेळेपूर्वी कार्यालयात उपस्थित नसणे अशामुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेताना दाखले मिळण्यास उशीर झाल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे लाभार्थी शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहु शकतो, ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वस्तीसाठी राहणे बंधनकारक आहे व यासाठी त्यांना शासनामार्फत निवास भत्ता सुद्धा दिला जातो.तरीही काही अधिकारी सोडले तर बरेचसे अधिकारी है आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आपल्या मुळ गावी अथवा शहराच्या ठिकाणी राहतात व शासकीय भत्त्याचा लाभ घेतात.महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत शासन निर्णयानुसार सावंतवाड़ी ताल्क्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिकप्रणाली पदधतीच्या निर्णयाची लवकरात लवकर कड़क अंमलबजावणी करावी. अशी मागणी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केली होती त्यांच्या आंदोलनच्या इशाऱ्याला यश आले असून जिल्हा परिषद स्तरावर संबंधित बायोमेट्रिक प्रणाली बाबत कार्यवाही सुरू झाली आहे.