For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘संकटी पावावे’... विमाकवच घ्यावे

06:30 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘संकटी पावावे’    विमाकवच घ्यावे
Advertisement

विविध प्रकारच्या जोखीमा निवारण्यासाठी गणेशानंतर व्यावहारिक तरतूद म्हणून विमाकवच महत्त्वाचे कार्य करते. संकटी पावावे...निर्वाणी रक्षावे हा अंतिम धावा विमा कंपनीसच करणे योग्य ठरते. जीवन सुरक्षा अपघात व मृत्यू आकस्मिकपणातून निर्माण होतात. त्यासाठी ‘योगक्षेम वहाम्यहम’ हे ब्रीदवाक्य असणारी भारतीय जीवन विमा म्हणजेच एलआयसी 68 वर्षे या सप्टेंबर महिन्यातच पूर्ण करीत असून देशाच्या विकासात व असंख्य कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात जीवनभर व जीवनानंतर सोबत मिळत आहे. आपली अर्थव्यवस्था लोकसंख्येच्या आकारमानाने जगात प्रथम क्रमांकाची झाली असून यामध्ये तरुण लोकसंख्या प्रमाण अधिक असल्याने आपण त्यास लोकसंख्येचा लाभांश म्हणतो. पण प्रत्यक्षात आणखी 25 वर्षानंतर किंवा भारताच्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करताना रुपेरी किंवा वृद्ध लोकसंख्येचा प्रश्न गंभीर बनणार आहे. हे आव्हान ओळखून अशा लोकसंख्येस व्यापक, सर्वाना सामावून घेणारे, सर्व आपत्तीतून संरक्षित करणारे विश्वसनीय साधन हे विमाच असते हे लक्षात घेऊन भारतीय विमा नियमन व विकास (घ्Rअघ्) (इरडाई)संस्थेने व्यापक असा विमा मसुदा तयार केला आहे. त्याचे तपशील सर्व विमाधारकांनी लक्षात घेणे आवश्यक असून विमा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणून या नव्या विमा सुधारणाकडे पहावे लागेल. विमा ग्राहकास संरक्षित करणारी व विमा कवच घ्यावे यासाठी प्रवृत्त करणारी ही धोरणात्मक तरतूद तपशीलाने पाहू.

Advertisement

प्रमुख तरतुदी

ग्राहक हित संरक्षणार्थ नव तंत्रज्ञान वापरासोबत, पारदर्शी, सुस्पष्ट व उत्तरदायीत्व बांधिलकी स्पष्ट करणाऱ्या एकूण 10 तरतुदी आहेत. डिजिटल स्वरुपात: विमा पॉलिसी हरवणे व त्यासाठी डुप्लीकेट पॉलिसी घेणे यातून आता मुक्तता करण्यास विमा ई फॉरमॅटमध्येच दिला जाणार आहे. मात्र एखाद्यास तसे नको असल्यास विमा घेत असताना पर्याय द्यावा लागेल.

Advertisement

2) विमा प्रारंभ व महत्त्वाची कागदपत्रे :

विमा घेतल्यानंतर विमा कंपनीने सर्व महत्त्वाची कागदपत्रे 15 दिवसांत विमाधारकाला देणे बंधनकारक आहे. विमा प्रस्तावासोबतच विमा हप्ता घेण्यासाठी विमा कंपनीने प्रस्तावासोबत ‘चांगल्या आरोग्याचे’ प्रकटन ग्राहकाकडून घेणे आवश्यक आहे. विमाधारकाला जी महत्त्वाची कागदपत्रे विमा कंपनीकडून मिळणे आवश्यक असते त्यामध्ये विमा पॉलिसीसोबतचे पत्र ज्यामध्ये विमा मुक्त कालावधी (इrाा थ्ददक् झग्द्) दिलेला असतो. ग्राहक या काळात विमा प्रस्ताव रद्द करु शकतो. विमा प्रस्तावाची प्रत, विमा लाभाचे विवरणपत्रक, विमा आवश्यकता किंवा योग्यता पाहणी केली असल्यास त्याची कागदपत्रे व अन्य महत्त्वाची कागदपत्रे त्या विम्यासाठी आवश्यक असणारी देणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे.

3) ग्राहक माहिती पत्रक ण्ल्stदस घ्हदिस्atग्दह एपू - ण्घ्ए :

बंधनकारक विमा पॉलिसी सोबत त्या विम्याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यो, फायदे, व्याप्ती याबाबत विमाधारकास पुरेशी माहिती देण्याचे बंधन घालण्यात आले असून ही अत्यंत महत्त्वाची सुधारणा मानावी लागेल. अपुऱ्या माहितीतून येणारे गैरसमज व कायदेशीर तंटे टाळणे शक्य होणार आहे. ग्राहक माहिती पत्रकात पुढील स्पष्टता असणार आहे.

  • विमा प्रकार: मुदत विमा, जीवन विमा किंवा इतर प्रकार समावेशक आहे या बाबतचे स्पष्टीकरण.
  • आश्वासीत विमा रक्कम: (एल्स् Assल्rाd) दावापूर्ती वेळी विमाधारकास मिळणारी विमा रक्कम.
  • विमा लाभ: विमा पॉलिसीतून मिळणाऱ्या लाभाचे सविस्तर स्पष्टीकरण.
  • अपवाद: कोणत्या परिस्थितीत विमा संरक्षण मिळणार नाही त्याची माहिती.
  • महत्त्वाचे तपशील: यामध्ये विमा मुक्त कालावधी, विमा नूतनीकरण दिनांक, कर्ज सुविधा इ. तपशील यात देणे बंधनकारक आहे.
  • दावा प्रक्रिया: विमा दावा करण्याची प्रक्रिया यात स्पष्ट केलेली असते.
  • ग्राहक सेवा: ग्राहकास मिळणाऱ्या सेवा, सुविधा याचे स्पष्टीकरण.

तक्रार नोंद पद्धत: तक्रार नोंदवण्याची पद्धत तसेच संपर्क क्रमांक ग्राहकास द्यावे लागतात.

विमा मुक्त कालावधी (इrाा थ्ददक् झग्द्)

एक वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या जीवन विम्यास मुक्त कालावधी मर्यादा 30 दिवसांचा असून या काळात विमा ग्राहकास पॉलिसी नाकारण्याचा अधिकार आहे.

  • विमा दावा कालावधी : विमाधारकास विमा दावा किती तत्वरतेने उपलब्ध होतो हे विमा कार्यक्षमतेचे व यशाचे मापदंड असते. याबाबत इरडाईने मृत्यू दावे 15 दिवसात द्यावे व जर संशयास्पद मृत्यू असल्यास 45 दिवसांची मुदत दिली आहे. विमा पूर्णत: अथवा अंशत: परत केल्यास 7 दिवसात क्लेम द्यावयाचा असून विमा पूर्तता रक्कम विहित तारखेस देणे बंधनकारक आहे. जर दावा विहित कालावधीत पूर्ण केला नाही तर ग्राहकास बँकेचा व्याजदर व 2 टक्के अधिक अशी भरपाई द्यावी लागेल.
  • वारसा आवश्यक: विमा प्रस्तावासोबतच वारसा नोंद सक्तीची असून विमा धारक एक किंवा अधिक व्यक्तींना वारस नोंदवू शकतो. अधिक वारस नोंदवलेस त्यांचा वाटा टक्केवारी द्यावी लागते.
  • आरोग्य विमा ग्राहक माहिती पत्रक: यामध्ये सर्वसाधारण आरोग्य विमाबाबत उपरोक्त माहितीसोबत आरोग्य विम्यात असणाऱ्या उपमर्यादा, वजाती, प्रतिक्षा कालावधी याबाबतचे तपशील समाविष्ट आहेत.
  • कॅशलेस दावे 3 तासात: आरोग्य विम्याचा चांगला अनुभव ग्राहकांना उपलब्ध व्हावा या भूमिकेतून कॅशलेस दावे 3 तासात पूर्ण करण्याची मार्गदर्शक सूचना असून कोणत्याही पॉलिसीधारकास डिसचार्ज देणेपर्यंत थांबवून ठेवता येणार नाही. जर 3 तासापेक्षा अधिक कालावधी लागला तर हॉस्पिटलचे अधिकचे बिल विमा कंपनीस द्यावे लागेल. अधिक / अनेक विमाधारक: जर एकापेक्षा अधिक विमा कंपनीच्या पॉलीसी असल्यास विमा धारकास प्रथम निवडलेल्या पॉलीसीतून दावा रक्कम मिळेल. मात्र ही रक्कम अपुरी असल्यास दुसऱ्या पॉलीसीतून त्याची पूर्तता केली जाईल.
  • आरोग्य विमा मार्गदर्शक सूचना: आरोग्य विमा अद्यापी अल्प प्रमाणात घेतला जात असून हा विमा सर्व प्रकारच्या वयोगटासाठी, सर्व प्रकारच्या आजारासाठी, पूर्वीच्या आजारांना व जुनाट आजारांना समाविष्ट करणारी, सर्व प्रकारच्या उपचार पद्धतीसाठी, सर्व स्थितीत म्हणजे हॉस्पिटल/घरी उपचार घेणाऱ्यांसाठी, सर्व प्रदेशात, सर्व व्यवसायासाठी, सर्व हॉस्पिटलमधून उपलब्ध करण्याच्या मार्गदर्शक सूचना विमा विस्ताराची, समावेशकतेची सुरुवात मानावी लागते.

विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सर्वस्पर्शी व सर्वव्यापी विमा संरक्षणातून साध्य होईल. एकूण वित्तसाक्षरतेत विमा साक्षरता महत्त्वाची असून इरडाईच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरते. आपण जागरूक विमाधारक होणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते!

- प्रा. डॉ. विजय ककडे

Advertisement
Tags :

.