कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूरमध्ये गाढव संवर्धनासाठी कृतीशील उपक्रम

12:13 PM May 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इंद्रजित गडकरी : 

Advertisement

आज जागतिक गाढव दिनानिमित्त कोल्हापूर शहरात ‘जागतिक गाढव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गाढव हा कष्टाळू, आज्ञाधारक आणि उपयुक्त प्राणी असूनही नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. या बहुगुणी प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचालित निसर्गमित्र परिवारतर्फे विशेष उपक्रम आयोजित केला आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरातील 300 हून अधिक गाढवांसाठी चारा संकलन मोहीम या उपक्रमाचा मुख्य भाग आहे.

Advertisement

महाराष्ट्रात धोबी, वडार, कुंभार आणि कैकाडी समाजातील लोक प्रामुख्याने गाढवे पाळून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या 5,000 वर्षांपासून मानव गाढवांचा उपयोग ओझे वाहण्यासाठी आणि इतर कामांसाठी करत आहे. मात्र, शहरीकरण, यांत्रिकीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गाढवांचा वापर कमी होत आहे. गाढवांच्या कल्याणासाठी निसर्गमित्र परिवाराने जागतिक गाढव दिनानिमित्त कृतीशील उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत नागरिकांना आपल्या घरातील जेवणापूर्वीचा निवडक कचरा, जसे की भाज्यांची देठे, पाने, फळांची साले, इत्यादी, गाढवांसाठी चारा म्हणून दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाने अंदाजे एक किलो चारा द्यावा, अशी अपेक्षा आहे. हा चारा केवळ कागदात किंवा कागदी पिशवीत बांधून दिल्यास स्वीकारला जाईल. सहभागी प्रत्येक व्यक्तीला निसर्गमित्र परिवारातर्फे साठवणुकीच्या धान्यासाठी ‘कडुनिंबाच्या गोळ्या‘ भेट देण्यात येतील. चारा संकलनासाठी अनिल चौगुले बाबाराजे महाडीक, . आय. बागवान यांच्याकडे संपर्क साधावा.

जागतिक गाढव दिन हा गाढवांसारख्या उपेक्षित प्राण्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या संरक्षणासाठी कृती करण्याचा संदेश देणारा दिवस आहे. कोल्हापूरकरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन गाढवांच्या कल्याणासाठी योगदान द्यावे,

                                                                                                                                                        अनिल चौगले निसर्गमित्र संस्था

जागतिक गाढव दिन ही संकल्पना डॉ. पीटर फर्स्ट या प्राणीप्रेमी आणि संशोधकाने सुरू केली. त्यांनी 8 मे हा दिवस गाढवांसाठी समर्पित करून त्यांच्याविषयी आदरभाव आणि जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अचूक वर्ष काही ठिकाणी नमूद नाही, पण 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला या दिनाची सुरुवात झाली. गाढवांचे ऐतिहासिक, आर्थिक आणि सामाजिक योगदान ओळखणे आणि त्यांच्या कल्याणासाठी जनजागृती करणे, हा या दिनाचा उद्देश सांगितला जातो.

द डॉन्की सॅनक्चूरी लंडन आणि ब्रूक अॅक्शन फॉर हॉरसेस अॅन्ड डॉन्की या संस्था मध्य आशियामध्ये गाढवांच्या संवर्धन आणि पूर्नवसनासाठी जागतिक पातळीवर काम करतात. कोल्हापुरात अनिल चौगले यांची निसर्गमित्र संस्था काम करते.

गाढवाचे दूध हे अॅण्टिबॅक्टेरियल, अॅण्टिव्हायरल आणि अॅण्टिऑक्सिडंट गुणधर्म असलेले मानले जाते. ते दम्याचे रुग्ण, त्वचेचे आजार आणि पचनतंत्राशी संबंधित तक्रारी असलेल्या रुग्णांसाठी उपयोगी ठरते. लहान मुलांमध्ये दूध सहन न होणाऱ्या व्यक्तींमध्येही काही प्रमाणात गाढवाचे दूध उपयोगी मानले जाते, कारण ते हलके आणि सहज पचणारे असते.

2019 च्या पशूगणनेनुसार, महाराष्ट्रात केवळ 18,000 गाढवे शिल्लक आहेत. गाढव हा ‘झीरो मेंटेनन्स’ प्राणी आहे. परंतु त्याच्या संवर्धन, आहार, आरोग्य आणि निवाऱ्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. पशुपालक आणि पशुवैद्यकीय तज्ञांच्या मते, गाढवे अनेकदा उकिरड्यावर चरताना प्लॅस्टिक वेष्टणे खातात, ज्यामुळे पोटफुगीच्या विकाराने त्यांचा मृत्यू होतो.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article