खादरवाडी येथे किल्ला स्पर्धांचा बक्षीस वितरण उत्साहात
यंदाही होणार किल्ला स्पर्धा : लाभ घेण्याचे आवाहन
वार्ताहर/ किणये
खादरवाडी येथील श्रीराम सेना हिंदुस्थान शाखेच्यावतीने गतवषी भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच गावातील ब्रह्मलिंग मंदिरात झाला. अध्यक्षस्थानी राकेश पाटील होते.
गतवषी झालेल्या किल्ला स्पर्धेमध्ये माऊती गल्ली येथील तऊणांनी व बालकांनी विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारून प्रथम क्रमांक मिळविला. शिवाजी गल्ली येथील कार्यकर्त्यांनी किल्ले रोहिडाची प्रतिकृती साकारुन द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच गणपत गल्ली येथील बाल गणेश युवक मंडळ व माळवी कंपाउंड येथील एस एन वॉरियर्स यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. याचबरोबर मागील वषी एकूण वीस ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या.
स्पर्धकांचा शिवचरित्र, प्रमाणपत्र देऊन गौरव
सर्व स्पर्धकांना प्रत्येकी एक शिवचरित्र, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार सध्याच्या तऊणांनी आत्मसात करावे. तसेच गड किल्ल्यांचा इतिहास आताच्या बालचमूंना कळायला पाहिजे. यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे राकेश पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी उत्तम पाटील, भरमाणा कुंडेकर, रमेश माळवी, आप्पाजी येळ्ळूकर, बाळकृष्ण नेसरकर, राजेश पाटील, उत्तम मिसाळे, परशराम गोरल, म्हात्रू बस्तवाडकर आदींसह गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन महादेव दळवी यांनी केले. यावषीही दिवाळीमध्ये किल्ल्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीराम सेना शाखा खादरवाडी यांच्यावतीने देण्यात आली आहे.