लोकमान्य सोसायटीच्या किल्ला स्पर्धेचे उद्या बक्षीस वितरण
सर्व स्पर्धकांसह शहरातील शिवप्रेमींनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धा 2025’ चा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. शहापूर, आचार्य गल्ली येथील श्री राम मंदिर येथे सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
संस्थेच्या स्थापनेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व नवीन पिढीला समजावून देण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या या स्पर्धेस बेळगाव विभाग, शहापूर, वडगाव, अनगोळ व टिळकवाडी या भागातून बालचमू व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरात पुन्हा एकदा शिवमय वातावरण निर्माण झाले होते. यानिमित्त किल्ल्याबद्दल इतिहास, सखोल माहिती व विश्लेषण करणाऱ्या युवक, युवती आणि युवक मंडळांचे लोकमान्य सोसायटीकडून विशेष कौतुक होत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी तसेच संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू व डॉ. दामोदर वागळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. बक्षीस वितरण समारंभासाठी सर्व स्पर्धक व शहरातील तमाम शिवप्रेमींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेते याप्रमाणे-स्पर्धकांनी गड-किल्ल्यांच्या इतिहासाचे सखोल विश्लेषण करून त्यांची उत्कृष्ट मांडणी केली. या महत्त्वाच्या गटात साक्षी परशराम कणबर्गी, व्यंकटेश दोडमनी, भूमी भोसले व सोहम शिवाजी शहापूरकर यांनी यश मिळविले आहे.
शहापूर विभाग
मोठा गट - गडांचा राजा : श्री बालशिवाजी युवक मंडळ, हट्टीहोळ गल्ली (पुरंदरगड), प्रथम- हेमंत जांगळे, कचेरी गल्ली (तोरणागड), द्वितीय- सुजल सुधीर कालकुंद्रीकर, उपार गल्ली खासबाग (विजयदुर्ग), तृतीय- शिवक्रांती युवक मंडळ, महात्मा फुले रोड (पद्मदुर्ग), उत्तेजनार्थ- आचार्य गल्ली मित्र मंडळ, आचार्य गल्ली (अजिंक्यतारा). पाचवा- बी. एन. बॉईज, भारतनगर (राजहंसगड).
लहान गट - प्रथम - श्री गणेश युवक मंडळ, आनंदवाडी (राजगड), द्वितीय- गणेश, मनाल, शिवम, तांबिट गल्ली होसूर (राजमाची किल्ला). तृतीय- अथर्व, पार्थ, ऋतुराज, रितीक, बिच्चू गल्ली, गाडेमार्ग. (सज्जनगड), उत्तेजनार्थ- शिवांश नि. पाटील, मठ गल्ली, (राजहंसगड), पाचवा- सिद्धार्थ, प्रितम, विनायक, जोशी गल्ली, (राजहंसगड).
टिळकवाडी विभाग
मोठा गट- प्रथम-एस. के. वाय. नेस्ट बॉईज, तनय, सोहम, तिसरा क्रॉस, द्वारकानगर मंडोळी रोड, (सिंहगड), द्वितीय-अर्जुन, सक्षम, सान्वी, आस्था, आद्वित, एम. जी. रोड शांती कॉलनी. (लोहगड), तृतीय छत्रपती युवक मंडळ, सावरकर रोड, (पन्हाळा गड).
लहान गट - प्रथम- अरुण अमित पाटील, श्रेयस रा. निलजकर भवानीनगर, ओमण्णा, पाटील गल्ली मंडोळी रोड (राजहंसगड), द्वितीय- अक्षया महेश तवनोजीचे, अद्विक तवनोजीचे, शांती कॉलनी (काल्पनीक किल्ला), तृतीय - वैष्णवी, समर्थ, आराध्य, अथर्व, लेले ग्राऊंड रोड, गुरुकृपा अपार्टमेंट.
बेळगाव विभाग
मोठा गट - प्रथम- श्री शाहू युवक मंडळ, पहिला मेन विनायक कॉलनी, शाहूनगर. (शिवनेरी गड), द्वितीय- श्री भगवा चौक युवक मंडळ, पहिला क्रॉस नेहरुनगर. (प्रतापगड), तृतीय- पुरेश बा. रेडेकर, शिवाजीनगर दुसरी गल्ली (रायगड). उत्तेजनार्थ- जय शिवराय ग्रुप, लक्ष्मी मंदिराजवळ, भांदूर गल्ली. (ग्वाल्हेर किल्ला). पाचवा- शिवांश जांबोटकर, गुड्शेड रोड, गोडसेनगर (प्रतापगड)
लहान गट - प्रथम-आश्विनी विवेक बिर्जे, महाद्वार रोड, पाचवा क्रॉस (प्रचंडगड), द्वितीय- विहान प्रसाद असूकर, ऋषी, केतकी, संकल्प, विहान, नार्वेकर गल्ली. (मल्हारगड). तृतीय- प्रत्युष विनायक चौगुले, फुलबाग गल्ली, दुसरा क्रॉस. (मल्हारगड), उत्तेजनार्थ- मंदार, यश, आरुष, अभय, गोंधळी गल्ली, दत्त मंदिर. (पुरंदरगड), पाचवा- अस्वीक विशाल काडपण्णावर, राणी चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर. (विशाळगड).
अनगोळ विभाग
मोठा गट- प्रथम- शिवशक्ती युवक मंडळ, शिवशक्तीनगर, अनगोळ (लोहगड). द्वितीय- जयदीप ताशिलदार, भांदूर गल्ली. (वेल्लोर), तृतीय - श्री शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ (बसरूरदुर्ग). उत्तेजनार्थ- श्री बाल शिवाजी युवक मंडळ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, नाथ पै नगर (घोडप किल्ले). पाचवा- विशाल वि. लोहार, लोहार गल्ली, विश्वकर्मा मंदिराजवळ. (वेल्लोर).
लहान गट - प्रथम- बी. जी. बॉईज, सर्वेश तेवरे, दुसरा क्रॉस बाबले गल्ली (किल्ले खादेरी उंदेरी). द्वितीय- महादेव यशवंत पेडणेकर, ज्ञानेश्वरनगर मजगाव. (संतोषगड), तृतीय- वंश योगेश कामू, विठ्ठल बिरदेव मंदिराजवळ, तिसरा क्रॉस भाग्यनगर (विजयदुर्ग), उत्तेजनार्थ- समर्थ राजू पावशे, संस्कृती कॉलनी रेणुकानगर (वेताळगड), पाचवा- रुषील कलकुप्पी, शेवटचा बसस्टॉप, कलमेश्वर गल्ली (सिंधुदुर्ग).
वडगाव विभाग
मोठा गट - प्रथम- श्री हरी सालगुडी, लक्ष्मी गल्ली, कुलकर्णी गल्ली, जुनेबेळगाव (किल्ले देवगिरी), द्वितीय- संदीप सुनील कुंडेकर, नाझर कॅम्प (किल्ले लोहगड), तृतीय- जय गणेश युवक मंडळ, सोनार गल्ली (प्रतापगड), चतुर्थ- शिवराज पवन पाटील, केशवनगर चौथा क्रॉस येळ्ळूर रोड (सिंहगड), पाचवा- बाळ गणेश युवक मंडळ, कारभार गल्ली मागील बाजू. (किल्ले उंदेरी).
लहान गट - प्रथम - समर्थ अनंत बिर्जे, पाटील गल्ली, (मल्हारगड), द्वितीय- अराध्य अनंत लाड, विष्णू गल्ली (प्रतापगड), तृतीय- समर्थ मनोहर अरूंदेकर, अन्नपूर्णेश्वरीनगर, सहावा क्रॉस येळ्ळूर रोड (रायगड), चतुर्थ- रोहन गजानन मंडलिक (मल्हारगड), पाचवा- मंदार, विहान, विराज, पटवर्धन लेआऊट सोनार गल्ली (सुवर्णदुर्ग).