शेष भारत यू-23 संघाचे नेतृत्व प्रियांशू मोलियाकडे
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बडोद्याचा उदयोन्मुख फलंदाज प्रियांशू मोलिया शेष भारत संघाच्या यू-23 संघाचे नेतृत्व करेल. हा संघ मागील हंगामातील कर्नल सी. के. नायडू करंडक विजेता असलेल्या तामिळनाडू संघाशी भिडणार आहे. हा चार दिवशीय सामना 1 ऑक्टोबरपासून एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवल जाईल.
21 वर्षीय मोलियाची 2025-26 च्या देशांतर्गत हंगमातील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत सात सामन्यांमध्ये 63 च्या सरासरीने 379 धावा केल्या. ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. मुंबईचा फलंदाज अंगकृष रघुवंशी हा त्याचा उपकर्णधार असेल. रघुवंशीने आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी चांगली कामगिरी केली होती. त्याने 12 डावांत 146 च्या स्ट्राईक रेटसह 422 धावा केल्या होत्या. ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश होता. या 22 वर्षीय ख्घ्sळाडूने मागील हंगामात विजय हजारे करंडक स्पर्धेत मुब्ंाईसाठी सात सामन्यांत दोन अर्धशतकांसह 270 धावा केल्या होत्या.
यू-23 शेष भारत संघ : प्रियांशू मोलिया (कर्णधार), अंगकृष रघुवंशी (उपकर्णधार), आयुष जेठवा, मनन भट, दिग्विजय पाटील, रक्षित मेहता, अरवेली अवनीश राव, मयंक वर्मा, इमंजोत सिंग चहल, चंद्रराज राठोड, वरूण सिंग भुई, गणेश सुथार, निखिल गिरी, चेतन शर्मा, जी. सुमित.