For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांश राजवत उपांत्य फेरीत

06:51 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रियांश राजवत उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/कॅलगेरी (कॅनडा)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या योनेक्स कॅनडा खुल्या 2024 च्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रियांश राजवतने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना चौथ्या मानांकित अॅन्टोनसेनचा पराभव केला.

अॅन्टोनसेन आणि राजवत यांच्यातील हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 79 मिनिटे चालला होता. पण प्रियांशने डेन्मार्कच्या अॅन्टोनसेनचा 21-11, 17-21, 21-19 अश गेम्स्मध्ये पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. प्रियांशने यापूर्वीच्या सामन्यात डेन्मार्कच्या गिमेकीचा पराभव केला होता. तसेच त्यानंतर त्याने जपानच्या तेकुमा ओबायेशीला नमून उपांत्यफेरी गाठली होती. आता प्रियांशचा उपांत्यफेरीचा सामना 2022 सालात या स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या अॅलेक्स लेनेरशी होणार आहे. अॅलेक्स लेनेरने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या निशीमोटोचा 21-17, 21-17 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे.

Advertisement

या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिचा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांचे आव्हान चिन तैपेईच्या शेन आणि झु यांनी संपुष्टात आणले. शेन आणि झु यांनी हा सामना 21-18, 19-21, 21-16 असा जिंकून उपांत्यफेरी गाठली आहे.

Advertisement
Tags :

.