महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रियांका जारकीहोळी 18 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

11:03 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी दि. 18  रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले आहे. साध्या व सरळ पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. मोजक्याच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाईल. उन्हाच्या चटक्याने सर्वांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे रॅली अथवा कार्यकर्त्यांना जमवून उमेदवारी अर्ज दाखल केल्यास सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. यासाठी साध्या व सरळ पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला जावा, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कळविले आहे. त्यानुसार मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाणार असल्याचे प्रियांका जारकीहोळी यांनी कळविले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article