For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोळंबेत पैठणीच्या खेळात प्रियांका परब विजेत्या

12:19 PM Sep 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
झोळंबेत पैठणीच्या खेळात प्रियांका परब विजेत्या
Advertisement

शालन गवस व सिध्दी गवस उपविजेत्या ; नवरात्रौत्सव निमित्त झोळंबे माऊली मंदिरात आयोजन

Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

नवरात्रौत्सव निमित्ताने झोळंबे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रौत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पैठणीच्या खेळात प्रियांका परब यांनी प्रथम क्रमांक पटकावित मानाच्या पैठणीच्या मिळवली. या पैठणीच्या खेळात शालन गवस हिने द्वितीय, तर सिध्दी गवस हिने तृतीय क्रमांक पटकावला. पदवीधर शिक्षिका सौ सुजाता गवस व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संदीप गवस यांच्या आयोजनातून माऊली मंदिराच्या सभामंडपात तब्बल सहा तास रंगलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकरराव गवस, सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाजी गवस, प्रायोजक सुजाता गवस, माजी सरपंच राजेश गवस, मानकरी प्रकाश गवस, सतेज गवस आणि एन. डी. गवस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी भविष्यात गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. झोळंबे गावात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या पैठणीच्या खेळात गावातील महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभाग होत मनमुराद आनंद लुटला. सहभागी महिलांना गवस कुटुंबीयांकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांनाही मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन बांदा केंद्र शाळेचे शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले तर यासाठी उपशिक्षिका स्वाती पाटील, शितल गवस, जगदिश गवस यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन झोळंबे देवस्थान स्थानिक उपसल्लागार समिती आणि व ग्रामस्थानी नियोजन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.