महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित

10:32 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युवा नेते राहुल जारकीहोळी : भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Advertisement

बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित आहे, असा दावा काँग्रेस युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केला. इस्लामपूर, चिक्कलद्दिनी, गजपती आदी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यावेळी ते बोलत होते. भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. काँग्रेसकडून राबविल्या जाणाऱ्या विकासाभिमुख योजनांना नागरिकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे धोरण व सिद्धांतांना पसंती देऊन अनेक कार्यकर्ते  काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.  चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयासाठी या घटना अधिक पूरक ठरणाऱ्या आहेत. मतदारसंघात मिळणारा प्रतिसाद व मतदारांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पाच गॅरंटी योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी केली आहे. या योजनांमुळे प्रत्येक कुटुंबाला 5 ते 6 हजाराचा आर्थिक लाभ होत आहे. गृहलक्ष्मी योजनेमुळे प्रत्येक घरातील महिलेला 2 हजार रु., मोफत वीज, मोफत बस, 5 किलो तांदळाऐवजी पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. या विकासाभिमुख योजनांची माहिती मतदारांना समजावून द्यावी, असे आवाहन राहुल जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी अनेक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article