For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांका जारकीहोळी यांचा मतदारसंघात झंझावात

11:03 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रियांका जारकीहोळी यांचा मतदारसंघात झंझावात
Advertisement

मतदारसंघातून उत्स्फूर्त पाठिंबा : काँग्रेसच्या विजयासाठी पूरक वातावरण

Advertisement

बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यानुसार मतदारसंघातील मतदारांकडून व्यापक प्रमाणात पाठिंबा मिळत असून अनेक संघ-संस्था, महिला संघटना, युवा संघटनांकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग दिला आहे. लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक गावाला भेट देऊन प्रचार केला जात असल्याने मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. गावोगावी जावून महिला संघटना, युवा संघटना, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटींवर भर दिल्याने त्यांनी मतदानावर वेगळी छाप उमटविली आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीमध्ये 17,41,758 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8,75,953 मतदार असून 8,65,731 महिला मतदार आहेत. 74 इतर मतदार आहेत. जातनिहाय मतदार पाहिल्यास लिंगायत 4 लाख 10 हजार, धनगर 1 लाख 70 हजार, एससी 1 लाख 65 हजार, एसटी 90 हजार, मुस्लीम 1 लाख 80 हजार, जैन 1 लाख 30 हजार, मराठा 1 लाख 70 हजार व इतर मतदार 2 लाख 55 हजार आहेत. या ठिकाणी लिंगायत मतदार निर्णायक ठरणार आहेत.

यावेळी राज्य सरकारने जारी केलेल्या पाच गॅरंटी योजनांमुळे मतदारांचा कल काँग्रेसकडे वळला आहे. विशेषकरून महिला मतदार काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी योजनांवर अधिक खुश आहेत. त्यामुळे महिला मतदार काँग्रेसला पाठिंबा देण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयाची वाट अधिक सुलभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. मंत्री सतीश जारकीहोळी जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांशी व नागरिकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांचे राजकीय वजन चांगले आहे. याबरोबरच प्रचारातही आघाडी घेतल्याने मतदारांमध्ये उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्याबाबत एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात पूरक वातावरण असल्याची चर्चा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.