For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांकाला मिळाला नवा चित्रपट

06:48 AM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रियांकाला मिळाला नवा चित्रपट
Advertisement

जॅक एफ्रॉनसोबत साकारणार महत्त्वाची भूमिका

Advertisement

अडीच दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रीय प्रियांका चोप्रा आता ग्लोबल  आयकॉन ठरली आहे. बॉलिवूडसमवेत हॉलिवूडमध्ये देखील तिने स्वत:चा ठसा उमटविला आहे. प्रियांका लवकरच भारतीय चित्रपटसृष्टीत 6 वर्षांनी पुनरागमन करणार आहे. एसएसएमबी 29 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. याचदरम्यान तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे.

प्रियांका लवकरच निकोलस स्टोलरच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात ती बेवॉच अभिनेता जॅक एफ्रॉनसोबत झळकणार आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱ्या या चित्रपटात मायकल पेना रेजिना हॉल, जिमी टॅट्रो, बिली आइचनर आणि विल फेरेल देखील महत्त्वाच्या भूमिकेत असेल.

Advertisement

प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. निकोलस स्टोलरनेच या चित्रपटाची कहाणी लिहिली असून तोच दिग्दर्शन करणार आहे. याची कहाणी एका गुन्हेगार युवकावर बेतलेली असून तो तुरुंगातून बाहेर पडतो आणि एका अनस्क्रिप्टेड टीव्ही कोर्टरुमला ओलीस ठेवतो. न्यायाधीशाच्या निर्णयामुळे स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे वाटत असते. न्यायाधीशाची भूमिका  विल फेरेल साकारणार आहे. तर गुन्हेगाराच्या भूमिकेत जॅक एफ्रॉन दिसून येईल.

Advertisement
Tags :

.