For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘क्रिश ४’मध्ये दिसणार प्रियांका चोप्रा

06:47 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘क्रिश ४’मध्ये दिसणार प्रियांका चोप्रा
Advertisement

वाराणसी चित्रपटातही मुख्य भूमिका

Advertisement

दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता भारतीय प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे. प्रियांका ही आता ऋतिक रोशनसोबत ‘कृष 4’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रियांका चोप्रा ही कृष फ्रेंचाइजीच्या दोन चित्रपटांमध्ये मुख्य नायिका राहिली आहे.

प्रियांकाने यापूर्वी दोन चित्रपटांमध्ये ऋतिक रोशनसोबत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांनी तिच्या आणि ऋतिकच्या केमिस्ट्रीला पसंतीही दिली आहे. ऋतिक हा कृष 4 मध्ये अभिनय करण्यासोबत याचे दिग्दर्शनही करणार आहे. त्याच्या दिग्दर्शनातील हा पहिलाच चित्रपट असणार आहे. यामुळे ऋतिक कॅमेऱ्यामागून गोष्टी कशा सांभाळतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Advertisement

प्रियांका चोप्रा यापूर्वी ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसून आली होती. यात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम हे कलाकार दिसून आले होते. यानंतर तिने हॉलिवूडमध्ये काम करण्यास प्राधान्य दिले होते. प्रियांका लवकरच ‘वाराणसी’ चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत परतणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू मुख्य भूमिकेत असणार आहे.

Advertisement
Tags :

.