‘कल्कि 2’मध्ये प्रियांका चोप्रा दिसणार
भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठा चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ हा मागील वर्षातील सुपरहिट चित्रपट होता, याचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी केले हेते. चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन यांच्यासोबत दीपिका पदूकोन मुख्य भूमिकेत होती. आता कल्कि 2 चित्रपटाची तयारी सुरू असून यात दीपिका सामील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपिकाच्या एक्झिटनंतर प्रियांका चोप्राची चित्रपटात एंट्री झाल्याचे समोर आले आहे. कल्कि 2 मधील सर्वात प्रभावी अभिनेत्रीच्या स्वरुपात तिची निवड करण्यात आली आहे. परंतु प्रियांकाकडून यासंबंधी अद्याप पुष्टी देण्यात आलेली नाही. प्रियांका याचबरोबर राजामौली यांच्या चित्रपटात महेश बाबूसोबत काम करत आहे. ‘कल्कि 2’च्या निर्मात्यांकडून अद्याप प्रियांकाचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. परंतु तिच्या तारखा चित्रिकरणासाठी जुळवून आणण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते. तर दुसरीकडे दीपिका पदूकोनने निर्मात्यांकडून अधिक मानधन आणि 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. याचमुळे निर्मात्यांनी तिला हटविण्याचा निर्णय घेतला आहे.