For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेबसीरिजमध्ये झळकणार प्रियांका चाहर

06:40 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेबसीरिजमध्ये झळकणार प्रियांका चाहर
Advertisement

तुषार कपूर देखील मुख्य भूमिकेत

Advertisement

बिग बॉस 16 ची स्पर्धिका प्रियांका चाहर प्रेक्षकांच्या पसंतीच्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. बिग बॉसमध्ये आल्यावर प्रियांकाला मोठे यश मिळाले आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकण्यास सज्ज आहे. प्रियांका सध्या स्वत:ची पहिली वेबसीरिज ‘दस जून की रात’साठी तयारी करत आहे.

प्रियांका चाहरने सोशल मीडियावर स्वत:च्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली आहे. तिने स्वत:ची नवी वेबसीरिज ‘दस जून की रात’च्या क्लॅपरबोर्डचे एक छायाचित्र शेअर केली आहे. प्रियांकाने ‘चला या कहाणीची सुरुवात करूया, तुम्हा सर्वांच्या प्रेमासोबत चालुया’ असे पोस्ट शेअर करत नमूद केले आहे. याचबरोबर एकता कपूरने देखील स्वत:च्या प्रॉडक्शन व्हेंचरच्या सेटवरील एक छायाचित्र शेअर केले आहे. प्रियांकासोबत या सीरिजमध्ये तूषार कपूर दिसून येणार आहे. जसवंद एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत सचिन मोहितेकडून ‘दस जून की रात’ची निर्मिती केली जात आहे. या सीरिजची सहनिर्माती एकता कपूर आहे. प्रियांका आणि तुषार हे पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहे. ही सीरिज जियो सिनेमा आणि अल्ट बालाजीवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांका याचबरोबर ‘नागिन 7’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. परंतु प्रियांकाने आता एकता कपूरसोबतच्या स्वत:च्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली असल्याने चाहते तिची ही सीरिज पाहण्यासाठी आतुर आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.