For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडो-हॉलिवूड चित्रपटात दिसणार प्रियामणि

06:22 AM Apr 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडो हॉलिवूड चित्रपटात दिसणार प्रियामणि
Advertisement

प्रियांका चोप्राने बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही स्वत:चे स्थान निर्माण पेले आहे. तसेच उर्वरित भारतीय कलाकारांसाठी मार्ग प्रशस्त केला आहे. प्रियांकाच्या मार्गावर चालत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणि आता एका इंडो-हॉलिवूड चित्रपटात काम करणार आहे. यात तिच्यासोबत एक भारतीय कलाकार झळकणार आहे.

Advertisement

या चित्रपटाची कहाणी हर्ष महादेश्वर यांनी लिहिली असून तेच याचे दिग्दर्शन करणार आहेत. आतापर्यंत या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही. हा एक फीचर फिल्म असेल, ज्याची कहाणी सत्यघटनेवर आधारित असणार आहे. यात एका स्थलांतरित परिवाराची भावुक कहाणी दाखविली जाणार आहे.

चित्रपटात प्रियामणिचे नायक म्हणून अभिनेता मोहित रैना दिसून येणार आहे. मोहितने यापूर्वी अनेक हिंदी चित्रपट तसेच सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. इंडो-हॉलिवूड प्रोजेक्ट माझ्या मनाला भिडणार आहे, कारण हा ओळख आणि आपलेपणाला अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त करतो असे मोहितने म्हटले आहे. तर या चित्रपटाची कहाणी आणि सत्याने मला या चित्रपटाकडे खेचल्याचे उद्गार प्रियामणिने काढले आहेत. अमेरिकेतील बाइसन प्रॉडक्शन्सने या क्रॉस बॉर्डर चित्रपटासाठी मुंबईच्या एज्योर एंटरटेनमेंटसोबत पार्टनरशिप केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.