For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोलमाल 5’मध्ये प्रियामणि

06:22 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गोलमाल 5’मध्ये प्रियामणि
Advertisement

खलनायिकेची भूमिका साकारणार

Advertisement

बॉलिवूडची सर्वात यशस्वी फ्रेंचाइजी पुन्हा एकदा स्वत:च्या नव्या चित्रपटासोबत परतणार आहे. गोलमाल 5 चित्रपटाच्या माध्यमातून अजय देवगण आणि त्याची गँग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टीचा कल्ट कॉमेडी चित्रपट पुन्हा लोकांना खळखळून हसविणार आहे. या चित्रपटात काही नवी नावं जोडली गेली असून यात अक्षय कुमार सामील आहे. तसेच आता दक्षिणेतील एका अभिनेत्रीची या चित्रपटात एंट्री झाली आहे.  गोलमाल 5 मध्ये अजय देवगणसोबत अक्षय देखील दिसणार आहे.

तर खलनायिकेच्या भूमिकेसाठी प्रियामणिचे नाव निश्चित करण्यात आले आहे. चित्रपटात ती एक नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारणार आहे. प्रियामणिसाठी ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. तिच्या भूमिकेची एंट्री चित्रपटात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येईल असे मानले जात आहे. प्रियामणिने यापूर्वी अजय देवगणसोबत मैदान या चित्रपटात काम केले होते. तसेच फॅमिली मॅन या वेबसीरिजद्वारे तिने देशभरात स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यामुळे तिचे चाहते गोलमाल 5 मधील तिचा अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.