For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात प्रियदर्शिनी

06:17 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘लग्नाचा शॉट’ चित्रपटात प्रियदर्शिनी
Advertisement

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो वधूच्या लुकमधील होता. हा फोटो तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवरील आहे. ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या पोस्टरमध्ये पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेत दिसणारा नायक-नायिका जोडीने उभे असून, दोघांच्याही चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव दिसतात. डोक्याला बंदूकसारखी बोटं लावलेली ही देहबोली पाहता लग्नाच्या धावपळीत काहीतरी मोठा घोळ होणार असल्याची स्पष्ट झलक पोस्टरमधून दिसतेय.  पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचा रस्ता आणि राशीचक्र अशा दृश्यात्मक घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यात ‘लग्नाअगोदरही लग्नानंतरही’ असे शब्दही दिसत आहेत. यामुळे प्रवास, वेळेचा गोंधळ, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे फेरे यांचा कथेशी असलेला संबंध सूचकपणे समोर येतोय. या चित्रपटाकरता गीत, संगीताची धुरा प्रवीळा कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. तर अक्षय महादेव गोर, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.