For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रिया विजयी, जादुमनी सिंग पराभूत

06:36 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रिया विजयी  जादुमनी सिंग पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/उलानबातार (मंगोलिया)

Advertisement

भारतीय बॉक्सर प्रियाने वर्चस्व गाजविणारा एकतर्फी विजय मिळविला तर जादुमनी सिंगला विजयासाठी संघर्ष करावा लागला. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी प्रिया व जादुमनी सिंगने विजय मिळवित आगेकूच केली.

महिलांच्या 60 किलो वजन गटात प्रियाने सफाईदार प्रदर्शन करीत कझाकच्या रिम्मा व्होलोसेन्कोवर 5-0 अशी एकतर्फी मात केली. तिची पुढील लढत चीनच्या द्वितीय मानांकित चेंगयू यांगशी होईल. या दोघींची लढत चुरशीची होण्याची अपेक्षा केली जात आहे.

Advertisement

पुरुषांच्या 55 किलो वजन गटात जादुमनी सिंगने अतिशय झुंजार लढत दिली पण जपानच्या रुइ यामागुचीने त्याच्यावर 3-2 अशी निसटती मात करीत जादुमनीचे आव्हान संपुष्टात आणले. यामागुची अग्रमानांकित बॉक्सर आहे. त्याने अस्ताना येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य तर बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.