For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत प्रिया पेंडूरकरचे यश

03:10 PM Jun 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत प्रिया पेंडूरकरचे यश
Advertisement

मालवण : प्रतिनिधी

Advertisement

इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.इस्रो बाल वैज्ञानिक लेखी व मुलाखत स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरची विद्यार्थिनी कु. प्रिया विलास पेंडुरकर हिने राज्यात ८वा क्रमांक पटकावला आहे. तिची इस्रोच्या विशेष शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली असून या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.तसेच साईश संतोष हिंदळेकर, सौजन्या सावंत, समृद्धी सहदेव गावडे, मनस्वी शैलेश परब आणि भूमी दिनेश परब या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.या सर्व विद्यार्थ्यांना सौ. अर्चना देसाई, सौ. संजना पाटकर, श्री. संगम चव्हाण, सौ. प्रज्ञा कदम आणि सौ. सुजाता सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तावडे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे, सचिव घनश्याम राणे, सर्व संस्था चालक, पालक व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.