For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रात जवान है’मध्ये प्रिया बापट

06:29 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रात जवान है’मध्ये प्रिया बापट
Advertisement

वरुण सोबती अन् अंजली आनंदही मुख्य भूमिकेत

Advertisement

वरुण सोबती हा टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रख्यात कलाकार आहे. अलिकडेच तो ‘असुर 2’ या वेबसीरिजमध्ये दिसून आला होता. वरुण सोबती आता लवकरच ‘रात जवान है’ या सीरिजमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत अंजली आनंद आणि प्रिया बापट मुख्य भूमिका साकारणार आहे.

रात जवान है ही सीरिज कॉमेडी धाटणीची आहे. यामिनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडने या सीरिजची निर्मिती केली असून याचे दिग्दर्शन सुमीत व्यास यांनी केले आहे. या सीरिजमध्ये वरुण, अंजली आणि प्रियासोबत अनेक दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. आईवडिल झाल्यावर तारुण्य संपुष्टात येते असे लोकांना वाटते, परंतु आम्ही या सीरिजद्वारे हाच भ्रम तोडण्याचा प्रयत्न करू असे सुमित व्यास यांनी म्हटले आहे.

Advertisement

या सीरिजमध्ये तीन मित्रांची कहाणी दाखविली जाणार आहे. जीवनातील वेडेपणा कायम ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न तिघांकडून होत असतो. वरुण, अंजली आणि प्रियासोबत काम करण्याचा अनुभव खरोखरच चांगला होता. रात जवान है ही सीरिज सोनी लिव्ह अॅपवर पाहता येणार असल्याचे सुमितकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.