कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कावळा नाका येथे होणार खासगी ट्रॅव्हल्सचे पार्किंग

01:29 PM Jul 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

शहरातील कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी मार्केट परिसरात शहरातील खासगी ट्रॅव्हल्सचे पार्कीग करण्यात येणार आहे. मंगळवारी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मनपा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या जागेची संयुक्त पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी जागेची स्वच्छता करुन घेण्याचे आदेश दिले.

Advertisement

शहरात दररोज सायंकाळी मध्यवर्ती बस ाdरस्थानक परिसरात खाजगी ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी ट्रॅव्हल्सना कावळा नाका येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. येथील छत्रपती ताराराणी मार्केट परिसरातील पार्कींगच्या जागेत ट्रॅव्हल्सचे पार्कींग करण्यात येणार आहे. पाहणी दरम्यान प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पार्किंगमधील डबरेज तातडीने हटवण्याच्या सूचना दिल्या तसेच आजपासून काही ट्रॅव्हल्सची ट्रायल घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयाला ट्रॅव्हल्स असोसिएशनने सहकार्य दर्शवले असून, लक्झरी बसेससाठी पार्किंगची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पार्कींगच्या मागील बाजूच्या भिंतीची उंची वाढवून देण्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली. भिंतीची उंची वाढवण्याचे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या पाहणीत अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, उपायुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, निवास पोवार उपस्थित होते.

प्रशासक के.मंजूलक्ष्मी आणि पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शिवाजी पार्क येथे अमृत 1 अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम ठप्प झाले होते. यावर तत्काळ उपाययोजना करत ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्त पुरवण्याच्या सूचनाही पोलीस अधिक्षकांनी दिल्या.

गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर इराणी खणीची स्वच्छता महापालिकेच्या वतीने करण्यात आली असून, या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी दिले. वॉच टॉवर, सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि विसर्जन मार्गांचे नियोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article