महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंडालनजीक खासगी आराम बसला अपघात, पाच जण जखमी

10:39 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुदैवाने जीवितहानी टळली : बसचे मोठे नुकसान

Advertisement

बेळगाव : मुंबईहून बेंगळूरला जाणाऱ्या खासगी आराम बसला शुक्रवारी पहाटे अपघात झाला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील इंडालनजीकच्या विठलाई मंदिरानजीक  घडलेल्या या अपघातात बसमधील पाच जण जखमी झाले आहेत. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. महामार्गावरून बस धारवाडच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरील ट्रकला धडक बसून ही घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वीरनगौडा पाटील (वय 54) रा. नुलवी, ता. हुब्बळ्ळी, मृण्मयी पाटील (वय 26) रा. पुणे, गणेश (वय 23) रा. गुलबर्गा, तेजस्विनी गडतरनवर (वय 48) रा. चित्रदुर्ग, राहुल जाधव (वय 29) रा. बिदर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article