महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खासगी कोळसा उत्पादन 140 दशलक्ष टनच्या घरात

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आर्थिक वर्ष 2024 मधील आकडेवारीतून माहिती समोर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

कोळसा मंत्रालयाला खाणकामात वाढ अपेक्षित आहे. खासगी क्षेत्रातून करण्यात आलेले कोळसा उत्पादन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 147 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. कोळसा खाणी ‘कॅप्टिव्ह’ (स्वत:च्या वापरासाठी) आणि व्यावसायिक वापरासाठी खासगी क्षेत्राला देण्यात आल्या आहेत. एका सरकारी निवेदनात असे म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 मधील 116 दशलक्ष टनांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 24 मध्ये उत्पादन 27 टक्के अधिक होते. कोळसा मंत्रालयाच्या मते, आर्थिक वर्ष 23 मध्ये 110 दशलक्ष टन कोळसा पाठवण्यात आला होता आणि तो 30 टक्क्यांनी वाढून 143 दशलक्ष टन झाला आहे. 31 मार्च 2024 रोजी 58 कोळसा खाणींमध्ये उत्पादन झाले तर 31 मार्च 2023 रोजी 49 खाणींमध्ये उत्पादन झाले. चार बंदिस्त खाणी आणि पाच व्यावसायिक खाणींसह नऊ कोळसा खाणींनी आर्थिक वर्ष 24 मध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले. एकूण 14.72 कोटी टन कोळसा उत्पादनापैकी ऊर्जा क्षेत्रातील कॅप्टिव्ह खाणींचे उत्पादन 12.13 कोटी टन, बिगर ऊर्जा क्षेत्रातील कॅप्टिव्ह खाणींचे उत्पादन 84 लाख टन आणि व्यावसायिक खाणींचे उत्पादन 1.75 कोटी टन होते. या बंदिस्त खाणी गेल्या आठ वर्षांत खासगी कंपन्यांना आणि सरकारी वापरासाठी देण्यात आल्या आहेत.

देशात अतिरीक्त कोळशाचा साठा

2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दशकांतील सर्व कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. कोळसा मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी कोळसा खाण क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले केले होते. कोळसा मंत्रालयाने यापूर्वीच 64 खाणींचा व्यावसायिक लिलाव केला आहे. कोळसा मंत्रालयाला आशा आहे की कोळशाच्या खासगी खाणकामाला गती मिळेल. यामुळे देशात कोळशाचा अतिरिक्त साठा निर्माण होण्यास मदत होईल. याशिवाय कोळशाची सर्वात मोठी उत्पादक आणि वितरक असलेल्या राष्ट्रीय खाण कामगार कोल इंडिया लिमिटेडवरील दबाव कमी होईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article