राधानगरीच्या न्यूकरंजे दाऊदवाडी वळणावर खाजगी बस उलटली
अपघातात १ ठार ११ जखमी
भोगावती/प्रतिनिधी
राधानगरी जवळील न्यूकरंजे दाऊतवाडी येथील वळणावर खाजगी बसवरील चालकांचा ताबा सुटल्याने ती बस ऊलटली. यामुळे एक प्रवाशी जागीच ठार झाला असुन अन्य ११ प्रवाशी जखमी झाले आहेत.हा अपघात बुधवारी मध्यरात्री व गुरुवारच्या पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.अपघाताची फिर्याद निहार नरेंद्र साळवी रा.टेंबे रत्नागिरी यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल केली असुन बसचालक संदीप रामचंद्र फंड रा लातुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,गोव्याहुन कोल्हापुरकडे येणारी MH11-CH-7422 ही खाजगी आराम बस न्यू करंजे ते दाऊदवाडी ता राधानगरी येथील वळणावर आली असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस ऊलटली.यामध्ये मेहबुब नामक (पूर्ण नाव व पत्ता समजलेला नाही ) या प्रवाशाचा जागीच मॄत्यु झाला.तर अन्य ११ सहप्रवासी जखमी झाले आहेत .त्यांच्यावर राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अधिक तपास राधानगरीचे पो.नि.संतोष गोरे,पो.काॅ.कॄष्णात खामकर करीत आहेत.