For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौ. प्रिती सामंत ठरल्या कोलगाव सौभाग्यवतीच्या मानकरी

02:43 PM Feb 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सौ  प्रिती सामंत ठरल्या कोलगाव सौभाग्यवतीच्या मानकरी
Advertisement

तर वेशभूषा स्पर्धेत राज्ञी सामंत प्रथम ; कोलगाव माणुसकी प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांचे आयोजन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत राज्ञी सामंत हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर महिलांसाठी आयोजित केलेल्या कोलगाव सौभाग्यवती स्पर्धेत सौ. प्रिती सामंत यानी पहिल्या कोलगाव सौभाग्यवती होण्याचा मान पटकावला.शिवजयंती निमित्त कोलगाव ग्रामपंचायत रंगमंचावर आयोजित केलेल्या वेशभूषा व कोलगाव सौभाग्यवती स्पर्धेला लहान मुलांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहा वर्षाखालील या वेशभूषा स्पर्धेत एकूण ४६ लहान मुलांनी सहभाग घेतला. तर अंतिम फेरीपर्यंत रंगतदार ठरलेल्या कोलगाव सौभाग्यवती स्पर्धेत २४ महिलांनी सहभाग घेतला.
वेशभूषा स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम - राज्ञी सामंत द्वितीय - भूमि राणे, तृतीय - निधी परब, उत्तेजनार्थ - अनिषा ठाकूर व निधी सुतार, ते पहिल्या कोलगाव सौभाग्यवती - सौ. प्रिति सामंत, उपविजेत्या - संगीता पाटकर, प्रांजल गोवेकर, नेहा पेडणेकर, मिताली राऊळ. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पालव मॅडम आणि प्रदीप सावंत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ देसाई मॅडम यांनी तर सूत्रसंचालन श्री मेस्त्री सर यानी केले.यावेळी सांगेली आल्मेडा रेस्क्यू टीमचे बाबल आल्मेडा, सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा सामाजिक कार्याबद्दल माणुसकी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कोलगावचे ग्रामस्थ बाळा राऊळ, पुंडलिक राऊळ, चंदन धुरी, सुनील परुळेकर, बबन नाईक आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.