महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रिती रजक लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार

06:01 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हवालदार पदावरून बढती : 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत जिंकले होते रौप्यपदक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

गेल्या काही वर्षात प्रथमच महिलांना सैन्यात आव्हानात्मक भूमिका मिळू लागल्या आहेत. 2024 या नव्या वर्षाची सुऊवातही दिमाखात झाली असून लष्कराला पहिली महिला सुभेदार मिळाली आहे. चॅम्पियन ट्रॅप नेमबाज प्रिती रजक ह्या सुभेदारपद मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हवालदार प्रिती रजक यांच्या बढतीमधून भारतीय लष्कराने ‘नारी तू नारायणी, इस जग का आधार’ ही म्हण अंमलात आणली आहे. डिसेंबर 2022 मध्ये भारतीय लष्कराच्या मिलिटरी पोलीस कॉर्प्समध्ये सामील झालेल्या प्रिती सध्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीसाठी तयारी करत आहेत.

भारतीय लष्करातील प्रसिद्ध ट्रॅप नेमबाज हवालदार प्रिती रजक यांना सुभेदार पदावर बढती देण्यात आली. प्रिती यांनी यापूर्वी पहिली महिला कॉन्स्टेबल होण्याचा मान मिळवला आहे. तसेच त्यांनी चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप महिलांच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. सुभेदार प्रिती रजक आता भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार झाल्याची माहिती शनिवारी लष्कराकडून देण्यात आली. त्यांच्या बढतीबाबत लष्कराने शनिवारी एक निवेदन जारी केले. या निर्णयामुळे देशातील महिलांसह संपूर्ण लष्कराला अभिमान वाटत असल्याचे सांगतानाच प्रितीची ही कामगिरी महिला शक्ती आणि तिची विलक्षण शौर्य दर्शवते, असे लष्कराने म्हटले आहे. उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रिती यांना सुभेदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे त्याच्या क्षमतेची ओळख असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सुभेदार प्रिती रजक सध्या ट्रॅप महिला स्पर्धेत सहाव्या अखिल भारतीय मानांकित आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तयारीसाठी प्रिती आर्मी मार्क्समनशिप युनिटमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. लष्कराने प्रितीचे यश तऊणांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे तऊणींच्या आगामी पिढ्यांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरणा मिळेल. आपल्या कर्तृत्वामुळे आणि नेमबाजीच्या कौशल्यामुळे प्रिती यांनी लष्कराबरोबरच व्यावसायिक नेमबाजीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जितू राय यांनाही बढती

प्रितीच्या पदोन्नतीशिवाय शनिवारी भारतीय लष्करात सुभेदार मेजर आणि मानद लेफ्टनंट जितू राय यांनाही बढती देण्यात आली. त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सुभेदार मेजर आणि मानद कॅप्ट न ही रँक देण्यात आली आहे. अपवादात्मक प्रतिभावान असलेल्या जीतू राय यांना यापूर्वी पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article