रेडीत विकासकामे करण्यासाठी प्रितेश राऊळ यांचे यशस्वी प्रयत्न
मनिष दळवी यांचे प्रतिपादन ; रेडी येथील दशावतारी नाट्य महोत्सवाची सांगता
वेंगुर्ले (वार्ताहर)-
गेली चार वर्षे सातत्याने रेडी येथे नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दशावतारी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी जि. प. चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ हे भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. या महोत्सवास शेकडो रसिक ही उपस्थित राहून कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देत आहेत. रेडी गावात विकास कामांबरोबरच सामाजिक कामे करुन तसेच दशावतारी कलेला उभारी देण्याचे काम प्रितेश राऊळ हे सातत्याने करीत आहेत. अन त्यांना राणे साहेबांकडून वेळोवेळी प्रोत्साहन दिले जात आहे. राणेंच्या माध्यमातून रेडी गावात विविधांगी विकास कामे करुन घेण्यासाठी प्रितेश राऊळ यांचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी रेडी येथे दशावतार महोत्सव सांगता समारंभात केले.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत व दशावतार कला प्रेमी ग्रुप आयोजित भव्य दशावतार नाट्य महोत्सव समारोप कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांत कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, मच्छीमार नेते वसंत तांडेल, रेडी गावचे सरपंच रामसिंग राणे, माऊली देवस्थान रेडी चे विश्वस्त श्रीनिवास कामत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाळ राऊळ, ब्राह्मण कला क्रीडा मंडळाचे दादा नाईक, प्रभाकर राऊळ, जेष्ठ दशावतारी कलाकार ओमप्रकाश चव्हाण, जेष्ठ दशावतार कलावंत मंगेश राणे, जि. प. चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, रेडी ग्रामपंचायत उपसरपंच आनंद भिसे, ग्रामपंचायत सदस्य विनोद राणे, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, सिताराम राणे, श्रावणी भगत, पोलिस पाटील अमित मडये, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुसुदन मेस्री, आरवलीचे माजी उपसरपंच मयूर आरोलकर, सागरतीर्थ ग्रामपंचायतचे माजी सदस्य बबन बागकर आदी मान्यवरांचा समावेश होता.