‘प्रीतम अँड पेड्रो’ लवकरच येणार
राजकुमार हिरानी यांची सीरिज
दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. त्यांची पहिली वेबसीरिज ‘प्रीतम अँड पेड्रो’ची घोषणा करण्यात आली आहे. हिरानी यांच्या या वेबसीरिजचे एक खास पोस्टर जारी करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये दोन युवक पाठ दाखवत उभे असल्याचे दिसून येते. ही सीरिज हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. प्रीतम अँड पेड्रो एक सायबर-क्राइम थ्रिलर सीरिज असून ती 3 जुलै रोजी स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये अरशद वारसी आणि विक्रांत मैसी मुख्य भूमिकेत दिसून येऊ शकतात. तर राजकुमार यांचा पुत्र वीर हिरानी देखील याच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करू शकतो.
राजकुमार हिरानी यांच्याकडून दिग्दर्शित अखेरचा चित्रपट ‘डंकी’ होता, हा चित्रपट 2023 मध्sय प्रदर्शित झाला होता आणि यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. डंकी चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार यांनी ओटीटीच्या जगतात प्रीतम अँड पेड्रो सीरिजद्वारे पाऊल ठेवले आहे.