महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्वसाहाय्य संघांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाला प्राधान्य

11:24 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा पंचायतीचा उपक्रम : 3 लाख महिलांचा सहभाग

Advertisement

बेळगाव : ग्रामीण जीवनोपाय आणि महिला सबलीकरण विभागातर्फे महिलांना आर्थिकरीत्या स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. महिला स्वसाहाय्य संघांच्या माध्यमातून या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात 25 हजार 898 महिला स्वसाहाय्य संघ निर्माण करण्यात आले आहेत. या माध्यमातून कर्ज सुविधा याबरोबरच सरकारच्या सेवा सुविधांचा लाभ करून दिला जात आहे. या उपक्रमांतर्गत 2 लाख 95 हजार महिलांना सामावून घेण्यात आले आहे. यासाठी जि. पं. कडून पुढाकार घेण्यात आला आहे.

Advertisement

राज्य सरकारकडून महिला सबलीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. ग्राम पंचायत पातळीवरून या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे. सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये महिलांना सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. नुकताच राज्य सरकारकडून प्रारंभ करण्यात आलेल्या कृषी सखी, पशु सखी, आशा कार्यकर्त्या, महिला चालक, जल मित्र या योजनांच्या माध्यमातून ग्रा. पं. पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वसाहाय्य संघांच्या माध्यमातूनही आर्थिकरीत्या स्वावलंबी बनविण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देऊन स्वयंउद्योगासाठी चालना देण्यात येत आहे. दुग्ध व्यवसाय, पशुपालन, शेळी पालन, यासह गृहोद्योगांना चालना देण्यासाठी स्वसाहाय्य संघांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे.

विविध खासगी मायक्रो फायनान्सकडून अधिक व्याजदराने कर्ज पुरवठा करून महिला संघांची लूट केली जात आहे. हे थांबविण्यासाठी राज्य सरकारकडून जि. पं. च्या माध्यमातून स्वसाहाय्य संघ निर्माण करून आर्थिक पाठबळ देण्याबरोबरच सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देऊन आर्थिकरीत्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 25,898 महिला स्वसाहाय्य संघ निर्माण करण्यात आले आहेत. या अंतर्गत 2 लाख 95 हजार 186 महिलांना या उपक्रमांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत सरकारच्या योजना पोहचविण्यात येत असल्याची माहिती जि. पं. अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article