For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्याध्यापक संजय नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

09:58 PM Jun 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मुख्याध्यापक संजय नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Advertisement

कट्टा : प्रतिनिधी

Advertisement

पेंडुर माजी सरपंच, कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाचे संचालक, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल कट्टा प्रशालेचे मुख्याध्यापक, सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते संजय सुभाष नाईक (54) यांचे पेंडुर येथील राहत्या घरी रविवार पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, काका, काकी असा परिवार आहे. जि. प. माजी महिला व बालकल्याण सभापती श्रावणी नाईक यों ते पती होत. ते अण्णा या टोपण नावाने परिचित होते. जिल्हाभरातून अनेक शिक्षक, मित्रपरिवार, समाज बांधव यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सोमवारी दुपारी गावातील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.