For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

12:18 PM Sep 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
प्राचार्या डॉ  स्मिता सुरवसे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार
Advertisement

संगम कदम यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार ; कुडाळ SRM कॉलेजला यावर्षी दुहेरी सन्मान

Advertisement

वार्ताहर/कुडाळ

येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाला यावर्षी दुहेरी सन्मान मिळाला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांना मुंबई विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार तर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संगम कदम यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाल्याची गौरवपूर्ण घोषणा करण्यात आली.मुंबई येथील मुंबई विद्यापीठ पुरस्कार वितरण कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी उत्कृष्ट शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक योगदानाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. यावर्षी या मानाच्या पुरस्कारांसाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाची निवड झाल्याने महाविद्यालयीन परिवारात आनंदाचे वातावरण आहे.पुरस्कार विजेत्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी शिक्षणक्षेत्रातील दीर्घकालीन सेवेतून अध्यापन, संशोधन, सामाजिक भान व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक व नेतृत्वगुणांची दखल घेत सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना जाहीर झाला.पुरस्कार विजेते संगम कदम यांनी गेली अनेक वर्षे निष्ठा, प्रामाणिकपणा व शिस्तीच्या बळावर शिक्षकेतर सेवेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे महाविद्यालयीन प्रशासन सुसूत्र व कार्यक्षम राहिले आहे. त्यामुळेच त्यांना हा आदर्श गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाला. या दुहेरी सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांनी अभिमान व्यक्त केला. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे व संगम कदम यांचे अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.