भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर राजपुत्र एडवर्ड
ड्यूक ऑफ एडिनबर्ग इंटरनॅशनल अवॉर्डसाठी प्रचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटनच्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड तीन दिवसीय दौऱ्यानिमित्त भारतात दाखल झाले आहेत. ते ड्यूक ऑफ एडिनबर्ग इंटरनॅशनल अवॉर्डच्या प्रचारासाठी मुंबई आणि दिल्लीला भेट देणार अहेत. याच्या माध्यमातून ते युवांना जगभरातील अनौपचारिक शिक्षणाच्या लाभांविषयी जागरुक करणार आहेत. याचबरोबर ते केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. या भेटींदरम्यान भारत-ब्रिटन संबंधांवर चर्चा होणार आहे.
ड्यूक ऑफ एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारताच्या युवांना दिला जातो. युवांना स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणारे हे अनौपचारिक शिक्षणाचे माध्यम आहे. 1962 पासून आतापर्यंत या पुरस्काराद्वारे भारताच्या 325 शाळा आणि दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरून यांनी प्रिन्स एडवर्ड यांचे स्वागत पेल आहे.
ब्रिटन-भारत भागीदारी जगाच्या काही सर्वात महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर तोडगा शोधण्यास मदत करत आहे. युवांमध्ये गुंतवणूक करून आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी सर्व संधी मिळाव्यात म्हणून आम्ही उज्ज्वल भविष्याच्या संयुक्त दृष्टीकोनावर काम करू शकतो असे उद्गार कॅमेरून यांनी काढले आहेत.