For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राईम व्हॉलीबॉल लीगला एफआयव्हीबीची मान्यता

06:23 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्राईम व्हॉलीबॉल लीगला एफआयव्हीबीची मान्यता
Advertisement

30 नोव्हेंबरपासून पाचव्या हंगामाला सुरुवात

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘प्राइम व्हॉलीबॉल लीग’ला (पीव्हीएल) जागतिक संघटना असलेल्या एफआयव्हीबीकडून भारतीय ‘प्रथम श्रेणी’ (फर्स्ट डिव्हिजन) व्हॉलीबॉल लीग म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच या लीगचा पाचवा हंगाम 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा आयोजकांनी बुधवारी केली.

Advertisement

पाचव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 17 ऑगस्ट रोजी गोव्यात होणार आहे. या लिलावात विविध फ्रँचायझी भारतातील सर्वोत्तम व्हॉलीबॉल खेळाडूंच्या गटातून आगामी हंगामासाठी आपले संघ तयार करतील. लीगच्या मालकांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांतील सातत्यपूर्ण प्रगती आणि प्रभावावर शिक्कामोर्तब करणारी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ‘फेडरेशन इंटरनॅशनल डी व्हॉलीबॉल’ने (एफआयव्हीबी) पीव्हीएलला अधिकृतपणे भारतातील प्रथम श्रेणी व्यावसायिक व्हॉलीबॉल लीग म्हणून मान्यता दिली आहे.

या व्यतिरिक्त, प्राईम व्हॉलीबॉल लीगमध्ये सहभागी होणारे क्लब्स लागू नियम आणि पात्रता निकषांच्या अधीन राहून सेंट्रल एशियन व्हॉलीबॉल असोसिएशन, आशियन व्हॉलीबॉल कॉन्फेडरेशन (एव्हीसी) आणि एफआयव्हीबी क्लब स्पर्धांमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास पात्र ठरतील. यामुळे भारतीय क्लब्सना आशियातील आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम संघाविरुद्ध स्वत:ची क्षमता तपासण्याची नवीन संधी मिळेल.

बेलाईन व्हेंचर्सचे व्यवस्थापकीय संचालक व सहसंस्थापक आणि प्राईम व्हॉलीबॉल लीगचे संचालक तुहीन मिश्रा म्हणाले, ‘पाचवा हंगाम हा प्राईम व्हॉलीबॉल लीगसाठी एक निर्णायक क्षण आहे. एक विश्वासार्ह, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण लीग उभारण्यासाठी गेल्या चार वर्षांत केलेल्या कामाची एफआयव्हीबीची मान्यता ही एक मोठी पावती आहे.’

Advertisement
Tags :

.