Solapur News : पंतप्रधानांच्या पत्नीने घेतले भवानीचे दर्शन
तुळजाभवानी देवीसमोर मोदी कुटुंबीयांची कुलाचार महापूजा
तुळजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आणि त्यांचे बंधू यांनी मंगळवार, २३ डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी देवीची कुलधर्म कुलाचार पूजाअर्चा करून दर्शन घेतले.
सुरक्षितेच्या दृष्टीने अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी, पंतप्रधानाचे बंधू अशोक मोदी हे दोघे आले होते. त्यांनी २३ डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजता कडक सुरक्षा बंदोबस्तात पुजारी भाऊसाहेबअमृतराव यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीची कुलधर्म कुलाचार महापूजा करून मनोभावे दर्शन घेतले.
दर्शनानंतर पुजारी अमृतरावयांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर त्यांनी तुळजापूरपासून अवघ्या अडीच तीन किलोमीटरवर असणाऱ्या सिंदफळमंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास केली पूजा मंदिराच्यावतीने करण्यात आला सत्कार शिवारातील मुलेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुरक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती.
मंदिर प्रशासनाची याबद्दल संपर्क साधला असता मंदिर प्रशासनाकडून प्रसारमाध्यमाला कुठलीही माहिती देण्यात आली नाही. शहरात आणि मंदिर परिसरात दिवसभर पंतप्रधान मोदी यांच्या पत्नी आणि बंधूनी दर्शन घेतल्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती.