For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तेजस फायटर’मधून पंतप्रधानांचे उड्डाण

06:39 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘तेजस फायटर’मधून पंतप्रधानांचे उड्डाण
Advertisement

अप्रतिम अनुभवातून स्वदेशी क्षमतेवरील आत्मविश्वास वाढल्याचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी बेंगळूर येथे तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केले. तेजस फायटर जेटमधून यशस्वीपणे उ•ाण केल्याचा अनुभव विलक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या उड्डाणामुळे देशातील स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास आणखी वाढला असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. तेजस विमानात त्यांनी एकूण 45 मिनिटे घालवली. यादरम्यान आकाशात उड्डाण करताना काही काळ सर्व नियंत्रणे त्यांनी स्वत: चालवली.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेजस लढाऊ विमानातून भरारी घेणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी ‘एक्स’ अकाउंटवर उड्डाणाचे फोटो शेअर करण्याबरोबरच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. कठोर परिश्र्रम आणि समर्पणामुळे आम्ही स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय वायुसेना, डीआरडीओ आणि एचएएल तसेच सर्व भारतीयांचे मन:पूर्वक अभिनंदन, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

 

‘एचएएल’च्या कार्यक्रमात सहभाग

तेजसमध्ये उड्डाण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी बेंगळूरमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथेही पोहोचले. तेजस लढाऊ विमान एचएएलने विकसित केले आहे. हे एकच इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे. त्याच्या दोन स्क्वॉड्रनचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या काळात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 83 लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एमके 1ए तेजस जेटच्या वितरणासाठी 36 हजार 468 कोटी ऊपयांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यांची डिलिव्हरी फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू होणार आहे. ‘तेजस’ची अद्ययावत आणि अधिक घातक आवृत्ती विकसित करण्यासाठी 9,000 कोटी ऊपये मंजूर करण्यात आले आहेत.

तेजस एमके 2 या हलक्मया लढाऊ विमानाचे इंजिन आणि स्वदेशी प्रगत मध्यम लढाऊ विमानाचे पहिले दोन स्क्वॉड्रन आता देशात तयार केले जातील. भारतातील संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड संयुक्तपणे ही इंजिने बनवतील. त्याच्या सर्व मंजुरी अमेरिकेकडून मिळाल्या असल्याचे नुकतेच  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांनी सांगितले होते.

या दिग्गजांचीही लढाऊ विमानातून भरारी...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 एप्रिल रोजी आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई 30 एमकेआय फायटर जेटमध्ये 30 मिनिटांसाठी भरारी घेतली होती. सुखोईमध्ये उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. त्यांच्यापूर्वी प्रतिभासिंह पाटील यांनी राष्ट्रपती असताना सुखोईमधून उड्डाण केले होते.

निर्मला सीतारामन : संरक्षण मंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी 17 जानेवारी 2018 रोजी राजस्थानमध्ये सुखोई-30 एमकेआयमधून उड्डाण केले. पायलटचा जी-सूट घालून मागच्या सीटवर बसणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या होत्या.

किरेन रिजिजू : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मे 2016 मध्ये सुखोई-30 एमकेआय विमानातून उड्डाण केले होते. पंजाबमधील भारतीय हवाई दलाच्या हलवारा तळावरून त्यांनी सुपरसॉनिक जेटद्वारे सुमारे 30 मिनिटे उड्डाण केले.

राजीव प्रताप रूडी : भाजप खासदार राजीव प्रताप रूडी यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी एरो इंडिया एअर शो दरम्यान सुखोई-30 एमकेआयमधून उड्डाण केले होते.

राव इंद्रजित सिंग : संरक्षण राज्यमंत्री म्हणून राव इंद्रजित सिंग यांनी ऑगस्ट 2015 मध्ये दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवरून सुखोई-30 मधून उड्डाण केले होते.

प्रतिभा पाटील : 25 नोव्हेंबर 2009 रोजी सुखोई-30 एमकेआयमधून उड्डाण करत प्रतिभा पाटील यांनी लढाऊ विमानातून हवाई भरारी घेणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपतीचा बहुमान मिळवत इतिहास रचला होता. वयाच्या 74 व्या वषी, त्यांनी पुण्यातील हवाई दलाच्या तळावरून समोरच्या सुखोई-30 एमकेआय फायटर जेटमधून सुपरसॉनिक स्तरावर 30 मिनिटांसाठी उड्डाण केले.

एपीजे अब्दुल कलाम : एपीजे अब्दुल कलाम हे 8 जून 2006 रोजी भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआयवर 30 मिनिटे उ•ाण करणारे पहिले राष्ट्रपती होते. सुपरसॉनिक वेगाने उड्डाण करताना त्याने कॉकपिटमध्ये सुमारे 40 मिनिटे घालवली.

जॉर्ज फर्नांडिस : एनडीए सरकारमध्ये संरक्षणमंत्री असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी 22 जून 2003 रोजी लोहगाव एअर फोर्स स्टेशनवरून एसयु-30 एमकेआयमधून उड्डाण केले होते.

 

‘तेजस’ची वैशिष्ट्यो...

तेजस विमानाचा ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट, विनाअपघात 6000 पेक्षा जास्त उ•ाणे

जगातील सर्वात लहान आणि हलके विमान, वजन केवळ 6,500 किलो

ताशी 2000 किमी वेग, मल्टीरोल विमान, संरक्षणासह हल्ला करण्यास सक्षम

तेजसमध्ये 9 हार्डपॉईंट असून क्षेपणास्त्र, रॉकेट व बॉम्ब बसवण्याची सोय

तेजसची लांबी 13.2 मीटर, ऊंदी 8.2 मीटर आणि उंची 4.4 मीटर

लढाऊ विमान कोणत्याही हवामानात उड्डाण करत हवेत इंधन भरू शकते

Advertisement
Tags :

.